पेडणेकरांचे सोमय्यांवर गंभीर आरोप; मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचीही घेणार भेट

Kishori Pedanekar| या भेटीला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली असल्याची माहिती आहे.
Kishori Pedanekar| Shivsena |
Kishori Pedanekar| Shivsena |

Kishori Pedanekar News मुंबई : कथित एसआरए घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांची चौकशी झाली होती. पण काल अचानक पेडणेकर यांच्या सासुबाई विजया पेडणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे वयोवृद्ध विजया पेडणेकर यांनी धसका घेतल्यामुळे हा मृत्यू झाला, असा आरोप आता पेडणेकर कुटुंबीयांकडून केला जात आहे.

त्याचबरोबर किरीट सोमया यांच्या आरोपानंतर किशोरी पेडणेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि किरीट सोमय्यांकडून वारंवार आरोप केले जात असल्याने ही भेट घेणार असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

Kishori Pedanekar| Shivsena |
नगर-मनमाड रस्त्याचे काम होणार सुरू : सुजय विखेंनी टक्केवारी मागणाऱ्यांना दिला हा इशारा

तसेच, माझ्या कुटुंबातील एकाचा बळी घेतला. तरीही मी 1 नोव्हेंबरला चौकशीला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. मात्र पेडणेकरांच्या या आरोपांबाबत माध्यमांनी विचारले असता किरीट सोमय्या यांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

किशोरी पेडणेकर यांच्यावर किरीट सोमय्यांकडून दररोजच नवनवे आरोप केले जात आहेत. SRA घोटाळ्यातील आरोपानंतर दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशी केली. त्यानंतर याच एसआरए प्रकल्पातील सहा गाळे पेडणेकरांनी हडपल्याचाही आरोप सोमय्यांनी केला. खोट्या सह्या करुन नातेवाईकांच्या नावे घोटाळा केल्याचाही आरोप सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com