निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा आटापिटा: पेडणेकरांचा पलटवार

kishori pedanekar news किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून खूप मोठे रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता.
निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा आटापिटा:  पेडणेकरांचा पलटवार

मुंबई : 'भाजपकडून हे सर्व सुडबुद्धीने केलं जात आहे. करु दे त्यांना जे कारायचं आहे ते, पण जे सत्य आहे ते लोकांच्या समोर येईलच. तपास यंत्रणांनाही त्रास देऊ नका. यंत्रणांना डिस्टर्ब करु नका. त्यांच काम त्यांना करु द्या. मुंबई पोलिसांनाही त्रास देऊ नका. शिवसैनिकांनी शांत रहा आणि तपास यंत्रणांना त्यांचं काम करु द्या, हेच सांगण्यासाठी मी इथे आले आहे,'असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. (Kishori pedanekar latest news)

आज पहाटेच्या सुमारास आयकर विभागाने शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला. या कारवाईनंतर शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत थेट यशवंत जाधव यांचे निवास्थान गाठले. ज्यामुळे त्याठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला होता. त्यानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. तर महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाधव यांच्या निवासस्थान परिसरात दाखल होत, शिवसैनिकांना शांततेचे आवाहन केले.

निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा आटापिटा:  पेडणेकरांचा पलटवार
आता सोमय्यांचा पाय खोलात! मुलाची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

"निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला जे कारायचं आहे ते करु द्या, आपण संविधान आणि कायद्यावर विश्वास ठेवूयात, सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही. पण शिवसैनिकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यासाठी आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कोणत्याही तपास यंत्रणांच्या चौकशीला आम्ही सामोरं जाण्यासाठी तयार आहोत. भाजपने सूडाचं राजकारण केलं तरी आम्ही घाबरणार नाही, अशा शब्दांत पेडणेकरांनी भाजपला सुनावलं आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी आज नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत "यशवंत जाधव (Yashwant Jadhav) बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून खूप मोठे रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर त्यासंदर्भात त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची नावंही जाहीर केली होती. यात यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांची नावांचा समावेश किरीट सोमय्यांनी केला होता

तसेच, किशोरी पेडणेकरांनी एसआरए सदनिका हडप केल्याचा आरोपही सोमय्यांनी केला. या आरोपांवर बोलताना, "किरीट सोमय्यांनीच मला फ्लॅट द्यावेत असा उपरोधिक टोला यावेळी किशोरी पेडणेकरांनी लगावला. किरीट सोमय्या यांनी त्यांच्याकडे असलेले फ्लॅट मला द्यावेत, भावाकडून बहिणीला भेट दिली जाते, त्याप्रमाणेच किरीट यांनी भावाच्या नात्याने मला त्यांच्याकडील प्लॅट मला द्यावेत, असे म्हणत महापौरांनी आरोप फेटाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com