shivsena : दुभंगलेली शिवसेना पुन्हा एक होईल ; निष्ठावंतांना आशा

आजी, माजी खासदार शिंदे गटात गेले, तरी त्यांचे समर्थक, मात्र वेट अॅन्ड वॉचच्या भुमिकेत आहेत.
eknath shinde, Uddhav Thackeray
eknath shinde, Uddhav Thackeraysarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधीत्व करणारे शिवसेनेचे (shiv sena) खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne), माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे दोघे पक्षाच्या एकनाथ शिंदे बंडखोर गटात काल सामील झाले. मात्र,त्याचा शहरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्य़ांवर, मात्र लगेच परिणाम झालेला नाही. ते वेट अॅन्ड वॉचच्या भुमिकेत आहेत. (shivsena latest news)

परिणामी पिंपरी-चिंचवड शिवसेनेत शांतता आहे.एवढेच नाही,तर खासदार बारणेंचे चिरंजीव विश्वजीत हे अद्याप युवासेनेचे पिंपरी-चिंचवड शहर अधिकारी म्हणून कायम आहेत.बारणे हे शिंदे गटात सामील झाले आहेत. मग, तुम्हीही तिकडे जाणार का असे विचारले असता अप्पांशी (श्रीरंग बारणे) बोलून पुढील निर्णय घेऊ,असे शिवसेनाप्रणित युवासेनेचे शहर अधिकारी विश्वजीत यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. संसद अधिवेशनानिमित्त दिल्लीत असलेल्या अप्पांचा फोन काल बंद लागला. आज संपर्क झाल्यावर त्यांनी बोलतो, असे सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच काय ते ठरवू, असे ते म्हणाले.

वेट अॅन्ड वॉच

दरम्यान, युवासेनेच्या वरिष्ठ पातळीवरून मुंबईतून आपल्याला अद्याप कसलीही विचारणा झाली नसल्याची माहितीही त्यांनी दिली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ते सुद्धा शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी भोसरी हा विधानसभा मतदारसंघ आढळराव हे तीन वेळा खासदार राहिलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो. तर,शहरातील उर्वरित पिंपरी आणि चिंचवड हे दोन विधानसभा मतदारसंघ बारणेंच्या मावळ मतदारसंघात मोडतात. हे दोघे शहराचे आजी,माजी खासदार शिंदे गटात गेले, तरी त्यांचे शहरातील समर्थक, मात्र वेट अॅन्ड वॉचच्या भुमिकेत आहेत. दुभंगलेला पक्ष पुन्हा एक होईल,अशी त्यांना आशा वाटते आहे.

eknath shinde, Uddhav Thackeray
संघटनेला फायदा नसलेले खासदार बारणे गेल्याने शिवसेनेचे नुकसान होणार नाही !

दोन्ही गटांचे पुन्हा मिलन होईल..

आढळराव यांनी काल लांडेवाडी येथील आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीला पिंपरी-चिंचवडमधून जिल्हा संघटिका (शिरूर) सुलभा उबाळे, भोसरीचे शिवसेना संघटक तथा प्रमुख धनजंय आल्हाटसारखे आढळरावांचे खंदे समर्थक सुद्धा उपस्थित नव्हते. या दोघांनीही दोन्ही गटांचे पुन्हा मिलन होईल,अशी आशा व्यक्त केली. त्यामुळेच कुणावरही टीका न करता तूर्त पक्षाबरोबर आहे,असे आल्हाट यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. आपणच नाही,तर शहरातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते थांबा आणि पहा या भुमिकेतच तूर्त आहोत, असे शिवसेनेच्या शहर संघटिका तथा महिला शहरप्रमुख ऊर्मिला काळभोर या ही म्हणाल्या.

आज बैठक

आजी, माजी खासदारांच्या भुमिकेनंतर काय भूमिका घ्यायची हे ठरवण्यासाठी शहर शिवसेनेची आज (बुधवारी) सकाळी आकुर्डी येथील शहर कार्यालयात (शिवसेनाभवन) शहरप्रमुखांनी बैठक बोलावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com