एकनाथ शिंदेंचा फोन आला होता; खासदार संजय जाधवांचा गौप्यस्फोट...

शिवसेनेचे (shivsena) १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात दाखल झाले आहेत
Sanjay Jadhav
Sanjay Jadhavsarkarnama

नवी दिल्ली : शिवसेना (ShivSena) आमदारांनतर आता खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का बसला आहे. पक्षाच्या एकून १९ खासदारांपैकी १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांचा फोन येऊनही त्यांना स्पष्ट शब्दात परभणीचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी नकार दिला. पक्षाने मला भरभरून दिले आहे. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे, असे जाधव यांनी सांगितले.

जाधव म्हणाले, मी शिवसेनेत कार्यकर्त्यापासून नेता झालो आहे. अपेक्षेपेक्षा खूप जास्त पक्षाने दिले आहे. एवढे सगळे पक्षाने दिल्यानंतर पक्षाची प्रतारणा करणे माझ्या विचारात बसत नाही. एकनाथ शिंदे आणि मी एकत्र विधानसभेत आलो होतो. आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे त्याचा आनंदच आहे. मात्र, तुटेपर्यंत ताणू नये, एका वटवृक्षाखाली वाढलो त्यावर घाव घालताना वेदना होतात. शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समेट घडवून आणावा. सामान्य शिवसैनिकाचे यात नुकसान होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Sanjay Jadhav
Shiv Sena News : शिवसेनेच्या घटनेतील कलम अकरा रोखू शकते एकनाथ शिंदेंची वाट!

मी पंढरपूरमध्ये असताना मला शिंदे यांचा फोन आला होता. मी महापूजेला गेलो होतो. तिथे बोलण्याचा योग आला नाही. मुख्यमंत्री म्हणून मंदिरात मी त्यांना सन्मान केला. सोबत या, असे ते म्हणाले होते. मात्र, मी मूळ शिवसेनेतच आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याचा मी मुलगा त्याला शिवसेनेने भरभरून दिले. माझ्या जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकाची भावना आहे की उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले पाहिजे.

Sanjay Jadhav
बंडखोरांनी शिवसेना फोडली अन् खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर...

दरम्यान, माझे भवितव्य तरी काय होते. एक शेतकऱ्याचा मुलगा हा माझा भूतळाळ आहे. माझ्या आयुष्यात बाळासाहेब ठाकरे आणि मतदारसंघातील जनता दोघांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे त्याची प्रतारणा करणार नाही. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. जेव्हा महाविकास आघाडी झालील त्यातून आम्हाला जशी वागणून मिळाली तशी ती मिळाली नाही, असेही ते म्हणाले. संघर्ष जिथे उभा राहील तिथे करु पण त्यासाठी पक्ष सोडणे हा पर्याय नाही, असेही जाधव यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com