जे काही होतं ते मुख्यमंत्र्यांना सांगितलं...आता मला बोलायचं नाही! : परमवीर सिंगांची नवी खेळी

त्यांनी वकिलाला ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’’ देत त्यांच्या माध्यमातून प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
paramveer singh
paramveer singhSarkarnama

मुंबई : तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करून फरार असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी अखेर वकिलाच्या माध्यमातून चांदीवाल समितीसमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात त्यांनी मला काही बोलायचे नाही, तसेच मला कोणतेही पुरावे सादर करायचे नाहीत, असे म्हटले आहे. (paramveer singh submitted affidavit before Chandiwal Commission through a lawyer)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी शंभर कोटी वसुलीचा आरोप केला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. पण, परमवीर सिंग हे गेल्या काही महिन्यांपासून गायब आहेत. ठाणे पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली आहे. तसेच, आयोगासमोरही त्यांनी हजेरी लावलेली नाही. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी कडक शब्दांत समज देताच त्यांनी वकिलाला ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ देत त्यांच्या माध्यमातून प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

paramveer singh
परमबीरसिंग अन् रश्मी शुक्ला पुन्हा अडचणीत; भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी समन्स

चांदीवाल आयोगासमोर सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात परमवीर सिंह यांनी म्हटले आहे की, मला काही सांगायचं नाही. मला काही पुरावे सादर करायचे नाहीत. तसेच मला काही उलट तपासणीही करायची नाही. शंभर कोटी वसुलीप्रकरणी सचिन वाझे याने २५ जून २०२१ व १५ जुलै २०२१ या दिवशी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तसेच, ११ जून २०२१ रोजी संजय पाटील यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या दोन्ही प्रतिज्ञापत्राबाबत मला अधिक काहीही बोलायचं नाही. या दोघांच्या प्रतिज्ञापत्रातील खुलाशाबाबत मला वैयक्तीक काहीही बोलायचे नाही, असेही सिंग यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले आहे.

paramveer singh
आमदार हितेंद्र ठाकूरांच्या मर्जीतील ज्येष्ठ नेता शिवसेनेच्या वाटेवर : जिल्हाप्रमुखपदाची ऑफर!

मला चांदिवाल आयोगासमोर कुठल्याही पक्षाची उलट तपासणी करायची नाही किंवा पुरावे सादर करायचे नाहीत. पण, माझा प्रत्यक्ष उपस्थितीबाबत मला सूट मिळावी, अशी विनंती परमबीर सिंग यांनी त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून आयोगाकडे केली आहे. माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मला माझे प्रतिज्ञापत्र बनवता येत नाही. तसेच, त्यावर सहीही करता येत नाही. या विषयासंदर्भात ज्यांना मी अधिकार दिले आहेत, ते हे प्रतिज्ञापत्र सादर करतील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यानुसार माजी आयुक्त परमवीर सिंह यांच्या वतीने त्यांच्या वकिलीने आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तसेच, जे काही उघड करायचे होते, ते परमबीर सिंह यांंनी मुख्यमंत्र्यांकडे उघड केलेलं आहे. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली आहे, असेही त्यांच्या वकिलांनी त्या प्रतिज्ञापत्रात मांडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com