परमबीरसिंगांचा धक्कादायक जबाब : सह्याद्री गेस्ट हाऊसवर बोलवून मला....

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही अडचणीत आणले आहे.
Parambir Singh
Parambir Singhsarkarnama

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यानंतर आता मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही अडचणीत आणले आहे. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याला पोलिस सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा दबाव होता असे म्हटले आहे. परमबीरसिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात हा धक्कादायक आरोप केला आहे.

Parambir Singh
वाझे प्रकरणात परमवीर सिंग यांनी ठाकरे, परबांवर केलेल्या आरोपाची चौकशी करा

परमबीरसिंग यांच्या नव्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात वादळ उठले आहे. भाजपने या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सचिन वाझे प्रकरणावरुन पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडी सामना रंगणार असल्याची शक्यता मिर्माण झाली आहे. परमबीरसिंग यांनी सांगितले की, सचिन वाझे यांना जून २०२० मध्ये पुन्हा पोलिस सेवेत घेण्यात आले होते. त्यावेळी निलंबित करण्यात आलेले अनेक पोलिस अधिकारी होते. याबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त, काही सहआयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत सचिन वाझे यांना पुन्हा पोलिस सेवेत घेण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. याशिवाय मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडूनही सूचना मिळाल्याचे परमबीरसिंग यांनी सांगितले.

तसेच वाझे याला गुन्हे शाखेची पोस्टिंग आणि नंतर काही महत्त्वाची तुकडी देण्याच्या सूचनाही मला होत्या. या दोघांकडून थेट वाझे यांना फोन करून प्रकरणांच्या तपासासंबंधीचे अपडेट्स घेतले आणि पुढे काय करायचे याच्या सूचना देण्यात आल्या. वाझे यांना पुन्हा पोलिस सेवेत घेण्यासाठी देशमुख यांनी त्यांच्याकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोपही परमबीरसिंग यांनी आपल्या निवेदनात केला आहे.

Parambir Singh
मोठी बातमी : अनिल देशमुखांनी आता अनिल परबांना आणलं चांगलंच अडचणीत

मुंबई पोलिसांत बदली पोस्टिंगसाठी जी समिती स्थापन केली जाते ती पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असते, या समितीमध्ये पीएसआय ते डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला जातो. मुंबई पोलिसांतर्गत बदल्यांची यादीही गृहमंत्रालयात तयार करण्यात आली होती. ही यादी मला स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचे पीए संजीव पालांडे किंवा त्यांचे ओएसडी रवी व्हाटकर यांनी दिली होती, असा आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. तसेच देशमुख यांनी अनेकवेळा सह्याद्री अतिथीगृहात बोलवले. तिथे देशमुख आणि अनिल परब यादी देत ​​होते आणि त्यांना अंतिम करण्यास सांगायचे असेही म्हटले आहे. हे आरोप अनिल देशमुख यांनी फेटाळून लावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com