Parambir Sinh on Suspension News: परमबीर सिंहांचं काहीच नुकसान नाही; निलंबन काळातली सेवा गृहीत धरणार !

Maharashtra Politics| राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने माजी पोलिसी आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले आहे.
Param bir Singh's suspension reversed
Param bir Singh's suspension reversedsarkarnama

Parambir Sinh Latest news Update: राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने माजी पोलिसी आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने २०२१ मधील निर्णय मागे घेतला आहे. विशेष बाब म्हणजे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) यांच्या आदेशानेच सिंह यांच्यावरील आरोप आणि त्यांच्यावर झालेली निलंबन मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार परमबीर सिंह यांची निलंबन कालावधीतील सेवा कायम धरण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Sinh) यांना राज्य सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

Param bir Singh's suspension reversed
Parambir Singh's suspension reversed: आघाडी सरकारला अडचणीत आणणाऱ्या परमबीर सिंह यांचे निलंबन मागे

मार्च २०२० मध्ये मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहीले होते. या पत्रात परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि इतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील बार मालकांकडून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचा आदेश दिले होते, असा गंभीर आरोप केला होता. सिंह यांच्या या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी धाारेवर धरल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. (Parambir Sinh Latest news)

लेटर बॉम्बनंतर परमबीर सिंह यांच्यावर मुंबईत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते.यानंतर सिंह हे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गायब होते. 25 नोव्हेंबरला मुंबईत परतले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ६ डिसेंबपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते.डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्यावर निलंबनाची कारवाईक करण्यात आली.

Param bir Singh's suspension reversed
Param Bir Sinh News : महाविकास आघाडीने निलंबित केलेल्या परमबीर सिंहांना शिंदे-फडणवीसांचे रेड कार्पेट; काय आहे कारण ?

परमबीर सिंहांवर आठ आरोपांतर्गत चौकशी सुरु होती. उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल करत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह (Parambir Sinh Latest news Update) यांच्या खात्यांतर्गत चौकशी आणि निलंबन करवाई विरोधात नोंदवत त्यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणानेही त्यांच्या वरील कारवाई मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यावर केलेली मागे घेत निलंबन काळातील त्यांची सेवा कायम करण्याच निर्णय घेतला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com