परमबीर सिंह यांचे पाय आणखी खोलात ; ईडीकडून समन्स

केंद्रीय तपास यंत्रणेकडून (CID) त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवशी चौकशीला हजर राहण्यास सीआयडीनं सांगितलं आहे.
Parambir Singh
Parambir Singh sarkarnama

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून (CID) त्यांना शनिवारी समन्स बजावण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी चौकशीला हजर राहण्यास सीआयडीनं सांगितलं आहे.

मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात श्यामसुंदर अग्रवाल यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधाक दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांना हे समन्स देऊन चौकशीला सोमवारी बोलावण्यात आले आहे. तर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात परमबीर सिंग यांना मंगळवारी हजर राहण्यासाठी समन्स देण्यात आलं.

ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातून सीआयडीला वर्ग झालेल्या भीमराव घाडगे यांच्या तक्रारीचा अँट्रोसिटीच्या गुन्ह्यात परमबीर यांचा जून महिन्यात जबाब सीआयडीने नोंदवला होता चंदीगढला जाऊन परमबीर यांचा जबाब सीआयडीकडून नोंदवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे.

Parambir Singh
शिवसेनेचे माजीमंत्री अर्जुन खोतकरांची ईडीकडून बारा तास चौकशी

मुंबई आणि ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात पाच खडणीच्या प्रकरणांची तक्रार आहे. या खंडणी वसुलीच्या प्रकरणात परमबीर सिंह यांच्यासोबतच सहाजण आरोपी आहेत. त्यामध्ये सचिन वाझेंच्या नावाचाही समावेश आहे. सचिन वाझेंना या प्रकरणात आधीच अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईच्या किला कोर्टाने परमबीर सिंह यांना खंडणी प्रकरणात फरार घोषित केले आहे.

चांदिवाल आयोगाने यापूर्वी परमबीरविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. वारंवार समन्स बजावूनही परमबीर सिंह हे हजर झाले नाही. त्यांना हजर राहण्यास चांदीवाल समितीने (chandiwal commission) सांगितलं आहे. ''हजर व्हायला सांगा, अन्यथा वॉरंटच्या अंमलबजावणीचे निर्देश द्यावे लागतील,'' असा इशारा न्या. चांदिवाल यांनी शनिवारी दिला होता. त्यानंतर परमबीर सिंह यांच्या वकीलांने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. परमबीर सिंह हे स्वतःच सोमवारी चांदिवाल चौकशी आयोगासमोर हजर राहणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.

परमबीर सिंह यांना फरार म्हणून घोषित केल्यानंतर ते दोन दिवसापूर्वी मुंबईत गुन्हे शाखेत हजर झाले आहेत. ३२१ दिवसांनी परमबीर सिंह (Parambir singh) यांचे 'दर्शन' झाल्यानंतर तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चैाकशी होत आहे. या प्रकरणाची चैाकशी चांदीवाल समितीही (chandiwal commission) करीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com