मुंडे भगिनी ब्रीच कँडी रुग्णालयात; 'धनंजय दादा'ची भेट घेवून केली विचारपूस

Dhananjay Munde | Pankja Munde | Pritam Munde : धनंजय मुंडे यांना काल सायंकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Dhananjay Munde | Pankja Munde | Pritam Munde
Dhananjay Munde | Pankja Munde | Pritam MundeSarkarnama

मुंबई : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांना काल सायंकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी रुग्णालयाच्या वतीने दिली. दरम्यान मुंडे यांच्या प्रकृचीची विचारपूस करण्यासाठी कालपासून नेते आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. अशातच आता धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या दोन्ही बहिणी, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही. माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांना हार्ट अटॅक आलेला नाही. या सारख्या खोट्या बातम्या पसरणे चुकीचे आहे, असेही त्या म्हणाल्या. यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनीही मुंडे यांची भेट घेवून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काल राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांना मुंबईच्या ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळपासून त्यांना अस्वस्थ वाटतं होते. त्यानंतर सायंकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याची प्राथमिक माहिती होती. त्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याच्या अफवाही समाज माध्यमांवर पसरल्या होत्या.

दरम्यान मुंडे यांना ह्रदयविकाराचा (Heart attack) झटका आला नाही. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. कामाचा ताण व प्रवासामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. काल रात्री उशिरा मी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांशी देखील सविस्तर चर्चा केली आहे. काही काळ आराम करून ते पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने जनतेच्या सेवेत रूजू होतील,'' अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh tope) दिली आहे. '

Dhananjay Munde | Pankja Munde | Pritam Munde
राऊतांना लवंडे म्हणणाऱ्या राज ठाकरेंना एका वाक्यात प्रत्युत्तर!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात मुंडेंना बेशुद्ध झाले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी केलेल्या उपचारानंतर त्यांना बरे वाटत आहे. त्यांची प्रकृतीही उत्तम असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. धनंजय मुंडेंना सध्या आराम करण्यास सांगितला आहे. त्यामुळे नागरिकांनी मुंडेना भेटायला येऊ नये, तिथूनच शुभेच्छा द्याव्यात, असेही मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com