पवारांनीही फडणवीसांचं कौतुक केलं पण पंकजा मुंडेंचं मौन का? राजकीय चर्चांना उधाण

राज्यसभेच्या निवडणुकीवर पंकजा यांच्याकडून एकही ट्विट करण्यात आलेलं नाही.
Pankaja Munde Latest Marathi News
Pankaja Munde Latest Marathi News Sarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने चमत्कार घडवत तिसरी जागा खेचून आणली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आखलेल्या रणनीताचा हा विजय असल्याचे सांगत केंद्रासह राज्यातील बहुतेक नेत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. भाजपच्या विजयाचे ते 'सिकंदर' ठरले. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही फडणवीसांचा चमत्कार मान्य केला. पण भाजप नेत्या पंकजा मुंडे अजून एक शब्दही बोलल्या नाही. त्यांच्या या मौनाचे आता अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत. (Pankaja Munde Latest Marathi News)

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी आहे. मागील काही महिन्यांपासून त्या राज्याच्या राजकारणात फारशा सक्रीय असल्याचे पाहायला मिळत नाही. राज्यसभा आणि विधान परिषदेचं तिकीटही त्यांना नाकारण्यात आलं. त्यामुळं त्या पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Pankaja Munde Latest Marathi News
क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदाराची काँग्रेसमधून हकालपट्टी; आमदारकीही जाणार?

राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा, निकाल तसेच विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतरही पंकडा मुंडे यांच्याकडून शुभेच्छा देणारं एकही ट्विट किंवा फेसबुक पोस्ट करण्यात आलेली नाही. विजय उमेदवारांनाही त्यांनी शुभेच्छा दिलेल्या नाहीत. फडणवीसांच्या कौतुकाचा सोशल मीडियात महापूर आलेला असताना मुंडेंच्या या सुचक मौनामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

2019 मध्ये राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पंकजा यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने केली जात आहे. विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्यास संधीचे सोने करीन, अशी भावनाही त्यांनी नुकतीच गोपनाथ गडावर बोलून दाखवली होती. पण त्यांना संधी मिळाली नाही.

Pankaja Munde Latest Marathi News
वजन घटवा, किलोमागे एक हजार कोटी मिळवा! गडकरींचं आव्हान खासदारानं स्वीकारलं अन्...

भाजपमधील एका गटाकडून त्यांना सातत्याने डावलले जात असल्याचा आरोप पंकजा यांच्या समर्थकांकडून केला जातो. त्यावर आता पंकजा यांनीही अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. राज्यसभा निवडणुकीला दोन दिवस उलटले तरी त्यांच्याकडून एकाही शब्दाची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरही त्या शांत राहिल्या आहेत. त्यामुळे ही वादळापुर्वीची तर शांतता नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com