पंकजा मुंडेंवर माझ्यापेक्षाही मोठी जबाबदारी आहे : विनोद तावडे

Pankaja Munde|Vinod Tawade : पक्षाच्या डोक्यात काही योजना असतात...
Pankaja Munde and Vinod Tawde Latest News
Pankaja Munde and Vinod Tawde Latest NewsSarkarnama

मुंबई : पक्षाच्या डोक्यात काही योजना असतात आणि त्या योजनेनुसार पुढे जायचे असते. आता तुम्ही म्हणालं की आशिष शेलार (Ashish Shelar) यांना मंत्रीपद दिल नाही. किंवा माझंही तिकीट कापलं होतं. मात्र पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतो. यामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे काम करत असतो. मला वाटत पंकजाताईंवर(Pankaja Munde) माझ्यापेक्षाही मोठी आणिचॅलेंजिंग काम आहे, असा प्रतिक्रिया भाजप (BJP) नेते आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलत होते.

Pankaja Munde and Vinod Tawde Latest News
रावसाहेब दानवे छत्रीत अन् विद्यार्थी पावसात उभे; फोटोंची होतेय चर्चा...

तावडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नंड्डा यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री आणि ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची आणि त्याचबरोबर माजी मंत्री आणि माजी मुंबई अध्यक्ष अशी शेलार यांची मुंबई शहराध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा केल्याचे सांगितले. येत्या काही महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून विशेष करून बदलते राजकीय घडामोडीमुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला एक वेगळे महत्त्व आलेल आहे. यामुळे शेलार यांच्यासारखे अनुभवी नेते ज्यांनी 35 वरून 82 नगरसेवकांपर्यंत भाजपने मुंबई महापालिकेत मजल मारली अशा कार्यकर्त्याची निवड होणं याला एक वेगळे महत्त्व असल्याच म्हटलं आहे. शेलार आणि त्यांची टीम केंद्रांनी जो त्यांच्यावर विश्वास दाखवला त्यावर ते खरे उतरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आणि शेलार आणि बावनकुळे या दोघांच अभिनंदन केलं.

Pankaja Munde and Vinod Tawde Latest News
राष्ट्रवादीला शिरूर कोल्हेंसाठी नव्हे; तर पार्थ पवारांसाठी सुरक्षित करायचा आहे : आढळरावांचा गौप्यस्फोट

पुढे तावडे पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, पंकजाताई राष्ट्रीय मंत्री आहेत. माझ्याकडे तरी छोट 90 विधानसभा सिट असलेलं हरियाणा राज्य आहे. पंकजाताईंकडे तर मध्य प्रदेश सारखं मोठं राज्य असून एक चॅलेंजिंग काम आहे. मध्यंतरी तिथे पोटनिवडणूक झाल्या होत्या. त्यावेळी पंकजाताई तिथे ठाण मानून होत्या आणि त्यांनी पक्षाला विजयी सुद्धा केला होत. त्यामुळे पंकजाताईंकडे माझ्यापेक्षाही मोठी जबाबदारी आहे असं वक्तव्य विनोद तावडे यांनी केला आहे. तर गिरीश महाजन म्हणाले की पंकजा मुंडेंना भविष्यात पुढे मोठी जबाबदारी मिळेल यावर बोलताना तावडे म्हणाले की महाजनांना याबाबत माहिती असेल तर त्यांना विचारावं लागेल, असा खोचक टोला लगावला आहे.

दरम्यान, तावडे यांनी देशभरात सुरू करण्यात आलेल्या हर घर तिरंगा या मोहिमेची माहिती दिली आणि यामध्ये सर्वांनी देशासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com