त्या एवढ्या मोठ्या नाही, या पवारांच्या वक्तव्यावर पंकजांचा पलटवार

शरद पवार यांनी शनिवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना खोचक टोला लगावला होता.
Pankaja Munde and Sharad Pawar
Pankaja Munde and Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना खोचक टोला लगावला होता. त्या एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत, असं पत्रकारांच्या एका प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले होते. पंकजा यांनीही पवारांच्या या वक्तव्यावर पलटवार केला आहे. 'त्यांच्या बोलण्यानं मी लहान होत नाही आणि मोठीही होत नाही,' असं त्या म्हणाल्या आहेत.

शरद पवार यांची शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांना पंकजा यांच्या दसरा मेळाव्यातील वक्तव्यावर विचारण्यात आले होते. सरकार पडणार की नाही, या भूमिकेतून बाहेर पडा, असा सल्ला पंकजा यांनी भाजपमधील नेत्यांना दिला होता. यावर बोलताना पवार यांनी त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करण्याएवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली होती.

Pankaja Munde and Sharad Pawar
लालुंना मोठा धक्का; पक्षाविरोधात मुलानेच केलं बंड

यावर बोलताना पंकजा म्हणाल्या, मी पवारसाहेबांचे वक्तव्य ऐकले नाही. पण त्यांचं बरोबर आहे. मी मोठी नेता नाही, लहानच नेता आहे. पण मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोललं पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे, असं मला शिकवलं आहे. पण त्यांच्या बोलण्यानं मी लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. ते आमच्यापेक्षा मोठेच आहेत, त्यात काही वादच नाही.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत रविवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पंकजा सकाळी मुंबई विमानतळावरून दिल्लीला रवाना झाल्या. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. ही बैठक नियमित असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या कामासाठी दर पंधरा दिवसांनी मी दिल्लीला जात असते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Pankaja Munde and Sharad Pawar
कलम 370 रद्द करण्यावरून मोहन भागवतांचं मोठं विधान

दसरा मेळाव्यातील आपल्या वक्तव्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, माझी भूमिका अशी आहे की,  आम्ही आता ज्या भूमिकेमध्ये आहोत त्याच भूमिकेत सक्षमपणे काम करत आहोत आणि करायला हवे. आपण आता जनतेसाठी काम करावे. सरकार पडतेय का राहतेय हा विषय गौण आहे. भाजपचा लोकांसाठी काम करण्याचा पिंड आहे. त्या भूमिकेत मी शिरले आहे. सरकार आणि विरोधी पक्षानेही जनतेसाठी काम करणे अपेक्षित आहे.

पंकजा या भाजपच्या व्यासपीठावर फारशा दिसत नसल्याचीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाडा दौऱ्यातही त्या सहभागी झाल्या नव्हत्या. याविषयी बोलताना पंकजा म्हणाल्या, ज्या व्यासपीठावर मी आवश्यक असते आमंत्रित असते तिथे उपस्थित राहते. ओबीसी मेळाव्यामध्ये उपस्थित होते. मराठवाडा दौऱ्याला मी नव्हते कारण मी त्यावेळी आजारी होते. देवेंद्र फडणवीस यांनाही ते माहीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com