OBC Reservation : सत्तेत असताना भूमिका बदलणे अपेक्षित नाही; पंकजांचा रोख कोणाकडे?

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची मागणी
Pankaja Munde news| OBC Reservation|
Pankaja Munde news| OBC Reservation|

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करुन नगरपालिका निवडणुकीना (Nagar Palika Election) स्थगिती द्यावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली आहे. ओबीसींना (OBC reservation) राजकीय आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता आहे. आरक्षणाविना निवडणुका झाल्या, तर त्या अन्यायकारक ठरतील, अशी भूमिका मुंडे यांनी घेतली आहे.

पंकजा मुंडे मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. येत्या १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाचा निर्णय १८ जुलैला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. यावेळी पंकजा म्हणाल्या, ओबीसी समाजाचे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष होते. जाहीर झालेल्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. मला सरकारकडून अपेक्षा आहेत. ओबीसी प्रश्नावर लढणारी कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना माझी विनंती आहे, की त्यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करुन तात्काळ आगामी निवडणुकांना स्थगिती द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.

Pankaja Munde news| OBC Reservation|
OBC reservation : निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे आदेश

राज्यातील ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका झाल्यानंतर जर उर्वरित ठिकाणी आरक्षण लागू झाले तर तो समान न्याय नसेल. या निवडणुकांनाही राजकीय आरक्षण मिळणे हा ओबीसींचा हक्क आहे. मागच्या वेळीही हीच मागणी होती, त्यात कुठलीही तडजोड नाही, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

Pankaja Munde news| OBC Reservation|
पंकजा मुंडेंना मंत्री करा; वैद्यनाथासह गणपतीला साकडे

ओबीसी आरक्षणामुळेच नाही, तर अतिवृष्टी, महापूर, यासारख्या कारणांमुळेही निवडणुकांना स्थगिती देता येईल. मात्र, ओबीसी आरक्षण हेही तितकंच गंभीर कारण आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता आहे. नोटिफिकेशन काढल्यावर निवडणुका कशा थांबवायच्या हा न्यायालयाचा प्रश्न उचितच आहे. मात्र, त्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. सत्तेत असताना-नसताना भूमिका बदलणे हे राज्याच्या राजकीय संस्कृतीला मान्य नाही, असेही पंकजा यांनी ठणकावून सांगितले.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजप नेते हे विरोधात असताना मांडत होते. आता भाजप सत्तेत आल्यानंतर निवडणुका झाल्या तर तो भूमिकेतील बदल ठरेल, असे तर पंकजा यांना सुचवायचे नाही ना, अशी चर्चा त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर सुरू झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in