Pankaja Munde Meets Dhananjay Munde: राजकीय संघर्षानंतरही भावा-बहिणीच्या नात्यात ओलावा : पंकजा पोहचल्या धनंजय मुंडेच्या भेटीसाठी!

Dhananjay Munde News: धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव केला होता.
Dhananjay Munde : Pankaja Munde
Dhananjay Munde : Pankaja Munde Sarkarnama

Dhananjay Munde Accident News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी भाजपच्या नेत्या व त्यांची बहीण पंकजा मुंडे हॉस्पिटलमध्ये पोहचल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत पंकजांनी विचारपूस केली. मुंबईतील ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. परळीत घडलेल्या अपघातामध्ये धनंजय मुंडे यांच्या बरगडींना इजा झाली होती.

Dhananjay Munde : Pankaja Munde
Legislative Council Election : नाशिक पदवीधरमध्ये वेगळीच खेळी होणार; शिंदे गट अन् भाजप मोठ्या अपक्षाला देणार पाठिंबा?

4 जानेवारी रोजी परळी या ठिकाणी रात्री 12.30 च्या वाजण्याच्या जवळपास धनंजय मुंडे यांच्या वाहनाचा अपघात घडून आला होता. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या बरगडीला इजा झाली होती. यानंतर त्यांना तातडीने परळीमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र पुढील उपचारांसाठी त्यांना विमानाने मुंबईत आणण्यात आलं.

धनंजय मुंडे यांच्या वाहनचालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडून आला. याआधीही विरोधीपक्षनेते अजित पवार यांनीही ब्रीच कॅण्डीत जाऊन मुंडेंची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. काल मंगळवारी (दि.१० जाने) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा मुंडेंची भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली होती.

Dhananjay Munde : Pankaja Munde
Legislative Council Election : नाशिक पदवीधरमध्ये वेगळीच खेळी होणार; शिंदे गट अन् भाजप मोठ्या अपक्षाला देणार पाठिंबा?

नात्यात दुरावा :

धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडे सोबत नात्यात दुरावा आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2014 विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडेंचा पराभव घडून आला होता. मात्र 2019 विधानसभेत धनंजय मुंडे यांनी विजय खेचून आणला. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com