उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं : पालघर जिल्हाप्रमुखानंतर उपजिल्हाप्रमुखांचाही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

ऐन निवडणुकीच्या तोंडावर वैभव संख्ये आणि जगदीश धोडी यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे.
Jagdish Dhodi-Eknath shinde
Jagdish Dhodi-Eknath shindeSarkarnama

पालघर : पालघर (Palghar) जिल्ह्यातील शिवसेनेला (shivsena) लागलेली गळती थांबवण्याचे नाव घेत नाही. पालघरचे जिल्हाप्रमुख वैभव संख्ये आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी शनिवारीच (ता. २४ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केला. तो धक्का पचत नाही तोच शिंदे गटाने आज (ता. २५ सप्टेंबर) शिवसेना पुन्हा झटका दिला आहे. कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश धोडी यांनी शिंदे गटात सामील होत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पुन्हा धक्का दिला आहे. धोडी यांच्यासह अनेक शिवसैनिक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. पालघरमध्ये शिवसेनेला खिंडार पडले असून पक्ष संघटना धोक्यात आली आहे. (Palghar Shiv Sena's sub-district chief joins Shinde group)

Jagdish Dhodi-Eknath shinde
फडणवीसांची विनंती मुख्यमंत्र्यांनी मेळाव्यातच मान्य केली अन्‌ नरेंद्र पाटलांच्या नावाची घोषणा केली!

शिवसेनेचे पदाधिकारी नीलम संख्ये आणि मुकेश पाटील हे दहा दिवसांपूर्वी शिंदे गटात सामील झाले होते. हा धक्का पचत नाही तोच आणखी एक झटका एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिला आहे. राजेश शहा यांची हकालपट्टीनंतर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारलेले वैभव संख्ये यांनी शनिवारी (ता. २४ सप्टेंबर) शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व सेना उपजिल्हाप्रमुख जगदीश धोडी यांनी आज शिंदे गटात सामील झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

Jagdish Dhodi-Eknath shinde
वळसे पाटलांनी १८ वर्षांत प्रथमच मानले आढळरावांचे जाहीर आभार!

ठाकरे गटाने पालघर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी वैभव संख्ये यांना दिली होती. त्याचबरेाबर जगदीश धोडी यांच्यावरही पक्षवाढीची जबाबदारी सोपवली होती. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया सुरू असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर वैभव संख्ये आणि जगदीश धोडी यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे.

Jagdish Dhodi-Eknath shinde
केंद्रीय मंत्री सीतारामन यांच्यासमोरच राहुल कुलांनी बोलून दाखवली दौंडच्या मंत्रिपदाबाबतची खंत!

पालघर, बोईसरमध्ये संख्ये आणि धोडी यांच्या पाठीराख्यांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात सामील होत असल्याने पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे चित्र दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com