पडळकर आणि खोत यांना सरकारने फसवलय : सदावर्ते यांच्या आरोपाने पुन्हा तिढा

गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी आझाद मैदानात येऊन एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण होणारच, असा दावा केला.
Sadabhau Khot,Gopichand Padalkar
Sadabhau Khot,Gopichand Padalkarsarkarnama

मुंबई : सरकारने पगारवाढ जाहीर केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे (ST workers strike) आंदोलन संपेल, अशी सरकारची अपेक्षा होती. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनीही हे आंदोलन तुटेपर्यंत ताणू नये, या मताचे झाले होते. मात्र या आंदोलनात वकिल म्हणून उतरलेल्या गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी आक्रमक भूमिका आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसमोर मांडली. त्यामुळे या आंदोलनाचा शेवट कसा करायचा, यावर नेत्यांचीच कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चेसाठी पडळकर आणि खोत गेले होते. त्यांच्या साक्षीनेच परब यांनी पगारवाढ जाहीर केली. त्यानंतर संप मागे घेतला जाणार का, असा प्रश्न पडळकर आणि खोत यांना विचारण्यात आला. आम्ही आझाद आंदोलनात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांशी बोलून निर्णय़ घेऊ, असे दोघांनी सांगितले. त्यांच्यामागे मिडियाच्या कॅमेऱ्यांचा ससेमिरा होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांशी त्यांना संवाद साधता आला नाही. त्यानंतर सदावर्ते यांची आझाद स्थळावर एंट्री झाली. त्यांनी विलीनीकरणाशिवाय आंदोलन थांबणार असल्याचे स्पष्ट केले.

Sadabhau Khot,Gopichand Padalkar
एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ जाहीर : 3600 ते 7200 रुपयांनी वेतन वाढणार

आपल्या टिकेचा रोख त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर वळवला. गोपीचंद पडळकर यांची फसवणूक परब यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र परब हे स्वतःच्या जाळ्यात अडकल्याचे सांगत परबांनी पगारवाढ तर केली पण संपही संपला नाही, असा दावा सदावर्ते यांनी केला. डंके के चोट पे विलीनीकरण घेणार, अशी घोषणा त्यांनी केली. 40 एसटी कर्मचाऱ्यांची आत्महत्या झाली आहे. तरीही शरद पवार विलीनीकरणाचे बोलत नाहीत. आम्ही कष्टकऱ्यांची मुले आहोत. आम्हाला तुमचे फाईव्ह स्टारमधील जेवण नको आहे. आम्हाला आमच्या हक्काचे विलीनीकरण हवे आहे. न्यायालयाने विलीनीकरण करू नका, असे कुठेही म्हटलेले नाही. तरीही सरकार वेळखाऊपणा करत आहे. पडळकर हा माझा छोटा भाऊ आहे. त्याला तुम्हा फसवायचा प्रयत्न केला आहे., याचा पुनरूच्चार त्यांनी केला. सरकारने या बोटावरची थुंकी त्या बोटांवर लावली आहे. फसवणुकीची लिमिट असते, असा आरोप त्यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांसाठी 600 कोटी देण्याचे सांगणारे तुम्ही एकटे 1000 कोटी घेता. हे नायालक सरकार आहे, अशी भाषा त्यांनी वापरली.

दुसरीकडे गोपीचंद पडळकर हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागरवर पोहोचले. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून कसा मार्ग काढायचा, यावर त्यांनी चर्चा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com