राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आमचा शिवसेनेला पाठिंबा; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar| Shivsena| दोन वर्षांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेकडून राज्यसभेची दुसरी जागा मागितली होती.
Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar latest news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेला पाठिंबा देणार आहे, मग शिवसेनेचे उमेदवार संभाजीराजे असो वा इतर कुणीही, अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेच्या जागेबाबत भाष्य केले. शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

दोन वर्षांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेकडून राज्यसभेची दुसरी जागा मागितली होती. त्यावेळी शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. तर पुढच्या वेळी राष्ट्रवादीने आपल्याला सहकार्य करण्याची मागणी तेव्हा शिवसेनेने केली होती. त्यामुळे यावेळी आम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. आता शिवसेनेचा सहाव्या जागेसाठी उमेदवार हे संभाजीराजे असो वा अन्य कुणीही, राष्ट्रवादी त्यांना मदत करेल आणि तो उमेदवार निवडून येईल." असा विश्वास यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.

Sharad Pawar
राष्ट्रवादीच्या नेत्यांना शरद पवारांकडून महत्वाची सूचना

दरम्यान, संभाजीराजेंची राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चांही सुरु होत्या. खासदार संजय राऊत शनिवारी उघडपणे यावर भाष्य केलं. राज्यसभेसाठी सहावा उमेदवार शिवसेनेचाच असणार आणि संभाजीराजे यांनी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारावी आणि निवडणूक लढवावी, असं संजय राऊत यांनी म्हटल. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती शिवसेनेने दिलेली ऑफिर स्विकारणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

तर गुरुवारी (19 मे) संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर भेट घेतली.राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांच्यात जवळपास 35 मिनिटं चर्चा झाली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे.

यावेळी उद्धव ठाकरेंनी संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या या प्रस्तावात सुधारणा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. आपली उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्याचा प्रस्ताव संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंना दिल्याचे समजते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com