Eknath Shinde : राऊतांना सत्तांतराचे स्वप्न पाहू द्या, आमचे सरकार भक्कम !

राऊतांना जे बोलायचे ते बोलू द्या, त्यांना स्वप्नात राहू द्या, पण आम्ही राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ.
Eknath Shinde Latest Marathi News
Eknath Shinde Latest Marathi Newssarkarnama

मुंबई : "उद्या महाराष्ट्रात पुन्हा सत्ता परिवर्तन झाले तर यात आश्चर्य वाटून घेऊ नका. शिंदे गटातील काही आमदार अस्वस्थ आहेत, त्यांना फसवले गेले. तेच आमदार आता आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे सत्तापरिवर्तन अटळ असेल," असे विधान आज सकाळी शिवसेनेते नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (eknath shinde) प्रत्युत्तर दिले आहे. (Eknath Shinde latest news)

"दोन्ही सदनात दोन तृतीयांश बहुमतही आम्हाला आहे. आमचे सरकार भक्कम आहे,"असे मुख्यमंत्री म्हणाले. "संजय राऊत हे स्वप्न पाहत असतात त्यांना स्वप्नात राहू द्या," असा टोला एकनाथ शिंदेंनी राऊतांना लगावला.

"राज्याचे मुख्यमंत्री वारंवार दिल्लीत जात आहे. एकाच महिन्यात पाच वेळेस मुख्यमंत्र्यांना दिल्लीत यावं लागतं, त्यामुळे ते त्यांचा मुक्काम दिल्लीत हलवणार आहेत का, असा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे," असा टोला राऊतांनी लगावला होता. त्यावर "ओबीसी आरक्षणासाठी दिल्लीवारी होती," असे शिंदेंनी स्पष्ट केलं.

Eknath Shinde Latest Marathi News
OBC: राज्य सरकारला झटका : 'या' जागांवरील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच

"दिल्लीवारी ओबीसी आरक्षणासाठी आहे. ओबीसी समजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात प्रलंबित होते.त्यासाठी कार्य केले. कायदेविषयक बाबींबाबत बैठका घेतल्या. राज्यातील ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम राज्यसरकार करीत आहेत, सुप्रीम कोर्टालाही मी धन्यवाद दिले आहेत. राऊतांना जे बोलायचे ते बोलू द्या, त्यांना स्वप्नात राहू द्या, पण आम्ही राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ," असे शिंदेंनी स्पष्ट केलं.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच

"आम्ही सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय गेत आहोत. पेट्रोल डिझेल दरकपात, पन्नास हजार परतफेड, कर्ज प्रकरणे आणि प्रकल्पावर आम्ही काम करीत आहोत. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकारचे काम आम्ही थांबू दिले नाही. राज्याच्या हिताचे निर्णय घेत आहोत, त्यांच्यासाठी आम्ही कार्य करीत राहू आम्ही जनतेच्या प्रश्नावर गंभीर आहोत.मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करणार आहोत," असे मुख्यमंत्री म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in