नाहीतर तुला जीवे मारू..! किशोरी पेडणेकरांना धमकीचे पत्र

Kishori Pedanekar| किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र येण्याची ही पहिलीच वेळ नाही
Kishori Pedanekar|
Kishori Pedanekar|

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. त्यामुळे सत्ताबदलाच्या हालचालींनाही वेग आला आहे. असे असताना मुंबईच्या माजी महपौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आले आहे. यात पेडणेकरांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पेडणेकर यांनी ना.म.जोशी पोलीस स्टेशनला याची तक्रार दाखल केली आहे.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी या धमकीच्या पत्राबाबत माहिती दिली. सरकार पडू देत मग बघून घेऊ, अशी धमकी या पत्रात देण्यात आली असून या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेखही करण्यात आला आहे. शिवाय अश्लील भाषेत शिवीगाळही करण्यात आली आहे. ' धक्कादायक म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच महाविकास आघाडी सरकार पाडण्यास सांगितले असल्याचा उल्लेख या धमकीच्या पत्रात करण्यात आला आहे. उरणमधील विजेंद्र म्हात्रे नावाच्या वकीलांने हे धमकीचे पत्र पाठवले आहे.

Kishori Pedanekar|
भाजपला मागे टाकत 'आरजेडी' बनला बिहारमधील सर्वात मोठा पक्ष

'मी विजेंद्र म्हात्रे.. जय महाराष्ट्र सायबर कॅफे, महाराष्ट्र बँक, उरणमधून बोलतोय. आत्ता लेखी लिहून पाठवतोय. सरकार पडू दे.. नाही तर तुला जीवे मारू. ते पत्रही मीच पाठवलं होतं. तुला जे करायचं ते कर. उद्धव ठाकरेंना सांग, आमच्या अजित पवारांच्या जिवावर मुख्यमंत्री झाला आहेस. जास्त माज करू नकोस. असा मजकूर किशोरी पेडणेकर यांना आलेल्या पत्रात लिहीण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र येण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही त्यांना धमकीचे पत्र आलं होते. त्या पत्रातही त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. महापौर झाल्यापासून त्यांना तिसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे.

याबाबत बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मी माझ्या घरी असताना एक मुलगी पत्र घेऊन आली, मी पत्र उघडलं तर त्यात काही लिहील्याचे दिसले. पत्राच्या मागे माझं चित्र होते. एक छोटा फोटो क्रॉप केला आहे. तसेच उरणचे शिवसेनेच्या आमदार आणि त्यांच्या बायकोचाही फोटो क्रॉप केला आहे. धमकी देणाऱ्याचं नाव आणि पत्ताही आहे. पण हे पत्र लिहिणारा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. असे माथेफिरु जर उगाचच धमकावत असतील, तर त्याची दखल आपण घेतली पाहिजे. या पत्रात आदित्य ठाकरेंनाही धमकी देण्यात आली आहे. असं वाटतयं की महाराष्ट्रात मुघलाई माजली आहे. हे कोणीतरी मुद्दाम करत आहे. पण धमक्यांना मी घाबरत नाही! असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com