'' देशातील इतर राज्यांना महाराष्ट्राची आदरयुक्त भीती होती, पण..!''; रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar : भाजपकडून सीमावादाचा कर्नाटकमधील निवडणुकीसाठी वापर
Rohit Pawar jpg
Rohit Pawar jpgsarkarnama

बार्शी : गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपची परिस्थिती वाईट होती. त्यामुळेच महाराष्ट्राचे सर्व प्रकल्प तिकडे नेले. मात्र, या प्रकल्पांमुळे दोन ते अडीच लाख कोटी गुंतवणूक गमावली शिवाय राज्यातील चार लाख तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. त्यासाठीच राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आणले. महाराष्ट्राची आदरयुक्त भीती देशातील इतर राज्यांना होती. पण आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावर्ती भागातील ४० गावांवर दावा केला. यापुढे त्यांची सीमावादावरील वक्ततव्यं खपवून घेतले जाणार नाही असा इशारा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिला आहे.

तसेच कर्नाटकमधील निवडणूक चार महिन्यांवर आली असून यासाठीच भाजपकडून सीमावादाचा निवडणुकीपुरता वापर केला जात असल्याचा आहे असल्याचा आरोपही आमदार पवार यांनी केला आहे.

Rohit Pawar jpg
Chandrakant Patil : शाईफेकीनंतर आता चंद्रकांत पाटलांची सोशल मीडियावर बदनामी; पोलिसांची मोठी कारवाई

बार्शी शहरातील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी राष्ट्रवादी मंथन,वेध भविष्याचा शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी आ.पवार बोलत होते.

पवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि भाजपची आग मस्तकात गेली. चिड बदला घेते अन् त्यातूनच काही दिवसांपूर्वी राज्यात बदला सरकार सत्तेवर आले. आता पुन्हा एकदा बदल घडवायचा असेल तर लढावंच लागेल. सर्व जाती-धर्मांसोबत घेऊन जायचे आहे. जनता ही ऊर्जा आहे. चंद्रकांत पाटील महापुरुषांबद्दल बोलले ते चुकीचे आहे पण शाई टाकली हे पण चुकीचे आहे

Rohit Pawar jpg
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर तरूणाचं टशन : फायरिंगचा व्हिडीओ व्हायरल,गुन्हा दाखल!

राज्यातील जनतेमध्ये महाराष्ट्राची अस्मिता आहे राज्यपालपद संविधानिक असताना अपमान केला पण जनता गप्प बसली नाही. अस्मितेची छेडछाड केली तर महाराष्ट्र दाखवून देईल. आम्हाला संविधानाचा आवाज कळतो दडपशाहीचा नाही. बार्शी तालुक्यात व्यापारी,युवा,महिला,सामान्य जनता दडपशाहीला भीक घालत नाहीत. राज्यासह तुमच्या तालुक्यात विधानसभेला परिवर्तन अटळ आहे असा दावाही आमदार रोहित पवार यांनी केला.

या शिबिराला जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,लतिफ तांबोळी, अॅड .गणेश पाटील,कविता म्हेत्रे,प्रिया पाटील,धनंजय साठे, बाळासाहेब शेख,महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे,माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले,माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले,इकबाल पटेल,मयूर काळे,अभिषेक आव्हाड,मंदाताई काळे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com