राज्यभरात मास्क सक्ती नाहीच; पण काही अपवाद

Covid 19| Maharashtra Corona virus news| राज्यातील दैनंदिन रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे
Maharashtra Corona virus news latest news
Maharashtra Corona virus news latest news

मुंबई : महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना सर्व सार्वजनिक ठिकाणी सक्तीने मास्क घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव, डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्याच्या आदेशांसह काही खबरदारीच्या सूचनाही दिल्या आहेत. (Mask Compulsion in Maharashtra)

गर्दीच्या ठिकाणांसह रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा यासारख्या सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज्याच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी (३ जून) जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने नव्याने निर्बंध लावणार असल्याची सांगितलं आहे. यात सार्वजनिक ठिकाणांसह आणि बंद जागांचाही समावेश आहे.

Maharashtra Corona virus news latest news
'2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेच...'; रोहित पवारांनी फडणवीसांना डिवचलं

'गेल्या काही दिवसांपासून राज्यातील चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. 1 जूनच्या आकडेवारीनुसार, 26 जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या साप्ताहिक चाचण्यांच्या संख्येत मोठी कमतरता आढळून आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण चाचण्यांचं प्रमाण तत्काळ वाढवण्यात यावे', असंही पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्यातील दैनंदिन रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईतील दैनंदिन कोविड रुग्णसंख्या 700 च्या वर पोहोचली आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात रुग्णसंख्या वाढीचा दर सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. राजधानी मुंंबईत राज्यातील सर्वाधिक सक्रीय रुग्णांची संख्या आहे. मुंबईत सध्या 3735 सक्रीय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रायगड 108, ठाणे 658 आणि पुण्यात 409 सक्रीय रुग्ण आहेत. ठाणे मनपा 77, नवी मुंबई 71, पुणे मनपा 72 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत शुक्रवारी (३जून) 763 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. काल दिवसभरात 352 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर सध्या मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्के इतका आहे. तर रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी 1576 दिवसांवर पोहोचला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com