शिंदेंकडील आमदारांचा आकडा 40 वर गेला अन् फडणविसांनी दिल्ली गाठली...

राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमवेतच्या आमदारांच्या संख्येचा आकडा ४० च्या पुढे गेल्यानंतर मुंबईत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 'सागर' बंगल्यावर बुधवारी पुन्हा सकाळपासूनच गाठीभेटी नेत्यांच्या वाढल्या.

त्यानंतर फडणवीस हे दुपारी साडेतीनच्या सुमारास दिल्लीला गेले. त्यामुळे नव्या सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचे भाजप (BJP) गोटात दिसत आहे. मात्र, या विषयावर फडणवीस यांच्यासह अन्य कोणतेही नेते काहीच बोलत नाही. राज्यातील राजकीय हालचालींसह शिंदे यांच्याकडील शिवसेनेच्या आमदारांवर लक्ष ठेवून दिल्लीतील नेत्यांनी सरकार आणण्याची सारी सूत्रे फडणवीस यांच्याकडे ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. गुवाहाटीत काही प्रमुख नेत्यांना पाठवून, शिंदे आणि आमदारांसोबत बैठका घेण्यात येत आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
एकनाथ शिंदेंनी 72 तासांनंतर ओपन केले पत्ते!

एका बाजूला या घडामोडी घडत असताना भाजप (BJP) देखील सत्ता स्थापनेच्या दृष्टीने मैदानात उतरली आहे. भाजपने त्यांच्या समर्थक आमदारांची जुळवाजुळव सुरु केली आहे. गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी माजी मंत्री परिणय फुके यांच्या पुढाकाराने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये केला प्रवेश. तसेच पक्षाला पाठींबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची विधीमंडळात सहयोगी सदस्य म्हणून नोंदणी करून घेण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
पवार युद्धात उतरताच शिवसेना आक्रमक; 12 बंडखोरांवर कारवाईची मागणी

भाजपला अपक्ष आमदार रवि राणा, महेश बादली, गीता जैन, राजेंद्र राऊत, प्रकाश आवाडे आणि विनोद अग्रवाल या पाच अपक्षांचा आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे अशा एकूण ८ आमदारांचा पाठिंबा आहे. या सर्वांची आता भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com