फडणवीसांनी एका दमात घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; दंतकथा, धक्का, पाठीत वार, खेळ अन्...

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर टीका केली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : आजचा दिवस हा अनेक महनियांना वंदन करण्याचा दिवस आहे. मात्र, काही लोकांना असे वाटते, ते म्हणजे महाराष्ट्र, त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान आणि त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान. पण लक्षात ठेवा महाराष्ट्राची 12 कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर केली.

मुंबईतील सोमय्या मैदानात भाजपतर्फे (Bjp) आयोजित महाराष्ट्रदिन सन्मान सोहोळा सभेत फडणवीस बोलत होते. या सभेला भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे (Vinod Tawde), सहप्रभारी जयभान सिंह पवैया, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रवीण दरेकर (Praveen Darekar), मंगल प्रभात लोढा, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, आशीष शेलार, अतुल भातखळकर उपस्थित होते.

Devendra Fadnavis
बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसैनिक नव्हता, मी उपस्थित होतो: फडणवीस

यावेळी फडणवीस म्हणाले, लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मराठी नाही. खरे तर तुम्ही म्हणजे हिंदू नाही. मात्र, मी असे म्हणणार नाही. कारण मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही. पण हे नक्की म्हणतो की तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. त्याच बरोबर फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या आजच्या मुलाखतीचा एका दमात समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, मला वाटले होते, मुख्यमंत्री महाराष्ट्र दिनाच्या दिवशी उद्योग, आरोग्य, राज्याची पुढील दिशा यावर बोलतील. मात्र, पुन्हा तेच टोमणे. दंतकथा, धक्का, पाठीत वार, खेळ, मार्केटिंग, भोंगे-पुंगी, माकडचाळे, बेडुकउड्या, पोटदुखी, बुद्धीबळ, चिरडणे, लढणे, मरणे, रडणे, पीडित, चाटण, बागुलबुवा, हात तोडणे, तमाशे, पोळी, बोंबा, नौटंकी, अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

Devendra Fadnavis
आता लढाई मुंबईच्या स्वातंत्र्याची : फडणवीसांनी फुंकले पालिका निवडणुकीचे रणशिंग

महाविकास आघाडी सरकारने मदत कुणाला केली? बिल्डर, दारु दुकानदार, विदेशी मद्यपिंना. बारा बलुतेदारांना काहीच नाही. मुख्यमंत्र्यांचे 'वर्क फ्रॉम होम' माहिती होते. आता सरकारचे 'वर्क फ्रॉम जेल' सुरू आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. आता मुख्यमंत्री म्हणतात तुटून पडा पण, लक्षात ठेवा, अंगावर आलात तर तुम्ही तुटालही आणि पडालही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. पोलिसांच्या बळावर हल्ले काय करता? आम्ही घाबरणार नाही, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com