एकामागोमाग एक झटके बसल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिंदे-फडणवीसांकडे धाव

शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीचे काही निर्णय रद्द केले आहेत.
NCP Leader Meets CM Eknath Shinde and Devendra Fadnavis
NCP Leader Meets CM Eknath Shinde and Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा कारभार हाती घेताच महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय रद्द केले आहेत. तर अनेक कामांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रामुख्याने काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. त्यानंतर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विधानभनवात शिंदे व फडणवीसांची भेट घेतली. (NCP Latest Marathi News)

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रिफ, दत्तात्रय भरणे आदी नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. शिंदे सरकारने सहकारी संस्था निवडणुकांना 30 सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

NCP Leader Meets CM Eknath Shinde and Devendra Fadnavis
महाराष्ट्रातील एसटी बसला मध्य प्रदेशात भीषण अपघात; तेरा जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची भीती

त्याचप्रमाणे ९४१ कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे. मार्च ते जून 2022 मधील दरम्यान मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यात एकट्या बारामती नगरपरिषदेला 245 कोटींचे वितरण झाले होते. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही भेट घेतल्याची चर्चा आहे. राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नये, अशी मागणी या भेटीत केल्याची माहिती अजित पवारांनी ट्विटरवर दिली.

सहकारी संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरले असलेल्या ठिकाणची स्थगिती उठण्याची मागणी केल्याचे समजते. अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. त्यानंतर आदल्यादिवशी निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती उठवल्यास अनेक संस्थांच्या मार्ग मोकळा होईल. आता याबाबत शिंदे सरकार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, अजित पवारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र देत राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची संबंधितांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. जुलैमध्ये अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या शंभरहून अधिक आहे. त्यांच्या नातेवाईकांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. याबाबत तात्काळ पावले उचलण्याची मागणी पवारांनी केली आहे.

शेतपिकांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करून नुकसान भरपाई द्यावी. अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. रस्त्यांची दुरावस्था झाली असून वाहनांचे अपघात वाढले आहेत. या रस्त्यांची दुरूस्ती व्हावी, त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, वीज वितरण व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी पवारांनी पत्राद्वारे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in