Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama

Presidential Election : शरद पवार जिंकले असते ; निवडणूक रंगतदार झाली असती !

राष्ट्रपती निवडणुकीत आपला उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजपकडे पूर्ण बहुमत नाही.

मुंबई : "महाराष्ट्र, हरियाणासह अनेक राज्ये हे भाजपविरोधी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) हे राष्ट्रपती निवडणुकीस उभे राहिले असते तर भाजपविरोधी सर्वांनी आपली मते शरद पवारांच्याच पारड्यात टाकली असती," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) म्हणाले. मात्र, यासाठी आम्ही 6 महिने आधीच तयारी सुरु करायला हवी होती, असेही राऊत म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते. (sharad pawar latest news)

"पवारसाहेब ही निवडणूक लढायला तयार नाहीत, त्यामुळे पवार साहेबांनी नाही म्हटल्यावर त्या संपूर्ण विरोधी पक्षाच्या आघाडीतली ऊर्जा निघून गेली आहे.सत्ताधारी पक्षाकडून या देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्वांना मान्य होईल असे एखादं नाव आलं तर चर्चा होऊ शकते," असे राऊत म्हणाले.

 Sharad Pawar
राष्ट्रपती निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांची अशी आहे रणनीती

संजय राऊत म्हणाले, "राष्ट्रपती निवडणुकीसाठी शरद पवार यांनी उभे रहावे, असा आग्रह सर्व विरोधी पक्षांनी केला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही पवारांना सर्व नेत्यांनी निवडणुकीस उभे राहण्याचा आग्रह केला होता. मात्र, पवार त्यासाठी तयार नव्हते. त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे आता विरोधी पक्षांकडून राष्ट्रपती निवडणुकीसाठी जो उमेदवार उभा केला जाईल, त्याला आम्ही मान्यता देऊ,"

 Sharad Pawar
presidential election : राजनाथ सिंह यांचा उद्धव ठाकरेंना फोन

"शरद पवारांनी निवडणुकीसाठी होकार दिला असता तर निवडणूक रंगतदार झाली असती. राष्ट्रपती निवडणुकीत आपला उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजपकडे पूर्ण बहुमत नाही. भाजपचे सर्वाधिक खासदार आहेत आणि खासदारांच्या मतांचे मुल्य सर्वाधिक असते. त्यामुळे भाजप मजबूत स्थितीत असला तरी ही निवडणूक केवळ खासदारांच्या मतांवर जिंकता येत नाही," असे राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com