राज्यपालांविरोधात विरोधक आक्रमक; माफी मागा नाहीतर...

Bhagatsingh Koshyari| गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे.
maharashtra governor bhagatsingh koshyasris meeting
maharashtra governor bhagatsingh koshyasris meetingSarkarnama

मुंबई : थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे... 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता.. मुख्यमंत्री शिंदे ...ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे.. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा.. दिल्ली पुढे किती झुकताय?'' अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई एका कार्यक्रमात बोलताना, गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे आता विरोधकांंनी आगपाखड केली आहे. संजय राऊत, मनसे नेते संदीप देशपांडे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

maharashtra governor bhagatsingh koshyasris meeting
गुजराती-राजस्थानी निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही; राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

संजय राऊत यांनी एका पाठोपाठ ट्विट करत राज्यपालांवर टीकास्त्र डागले आहे. ''आता तरी.. ऊठ मराठ्या ऊठ.. शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे.. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत.. मराठ्या तुलाच उठावे लागेल..असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, काय ती झाडी.. काय तो डोंगर.. काय नदी.. आणि आता... काय हा मराठी माणूस .. महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत.. जय महाराष्ट्र... , असे म्हणत त्यांनी आता शिंदे गटावरही निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, असही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तर मनसे नेते संदिप देशपांडे यांनीही राज्यपालांना इशारा दिला आहे. ज्या गोष्टींची राज्यपालांना माहिती नाही, ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, त्या राज्यपालांना नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नये. महाराष्ट्राच्या प्रगतीत मराठी माणसाचा हात आहे. जे लोक आले त्यांनी महाराष्ट्राची नाही तर स्वत:ची प्रगती केली, त्यांच्या प्रगतीत महाराष्ट्राचा, मुंबईचा हात आहे,'' असं संदिप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in