Andheri By Poll Election : अंधेरी पोटनिवडणुकीकडे मतदारांची पाठ

Andheri By Poll Election : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीवरून सुरुवातीपासून अनेक घडामोडी घडल्या होत्या.
Rituja Latke Latest News
Rituja Latke Latest News sarkarnama

Andheri By Poll Election: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील सर्व 256 मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली होती. यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28. 77 टक्के मतदान झाले.

अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीवरून सुरुवातीपासून अनेक घडामोडी घडल्या होत्या. त्यातून अखेर आज मतदान पार पडले. 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत एकूण 7 उमेदवार रिंगणात आहे.

Rituja Latke Latest News
'ते' दोन निर्णय बदलण्याचे धाडस शिंदे-फडणवीसांनीही दाखवले नाही : राजू शेट्टींनी व्यक्त केली नाराजी

सकाळपासूनच या पोटनिवडणुकीचे मतदान अत्यांत संथ गतीने होत होते. सकाळी 11 वाजेपर्यंत 9.72 टक्केच मतदान झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत 16. 89 टक्के तर दुपारी 3 वाजेपर्यंत 22. 85 टक्के मतदान झाले होते. तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.77 टक्के मतदान झाले. अजून फायनल आकडेवारी आलेली नसली तरी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचेच दिसून आले.

भाजपने (BJP) निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर निवडणूक होणार नाही, असेच मतदारांना वाटत होते. त्यामुळे शिवसेना (shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना प्रचार करताना निवडणूक होणार आहे, असाच प्रचार करावा लागला. मतदानासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी होती. मात्र, तरीही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली.

Rituja Latke Latest News
शिंदे गटातील आमदार ठाकरेंच्या संपर्कात; सुषमा अंधारेंनी थेट नावच सांगितले

अंधेरी निवडणुकीत असलेले उमेदवार

१. ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)

३. मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

४. नीना खेडेकर (अपक्ष)

५. फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

६. मिलिंद कांबळे (अपक्ष)

७. राजेश त्रिपाठी (अपक्ष)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in