धक्कादायक : महिला पोलीस अधिकाऱ्यावर आधी अत्याचार अन् नंतर ब्लॅकमेल - online friend sexually assults and blackmail woman police officer | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

धक्कादायक : महिला पोलीस अधिकाऱ्यावर आधी अत्याचार अन् नंतर ब्लॅकमेल

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 जून 2021

फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून एकाने महिला पोलिस अधिकाऱ्याला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 

मुंबई : फेसबुकवर (Facebook) झालेल्या मैत्रीतून एका व्यक्तीने महिला पोलीस अधिकाऱ्याला (police officer) गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्याने महिलेचा अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल (blackmail) करीत पैसे उकळल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या दोन मित्रांविरोधात पवई पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याबाबत मुंबईत असा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

या महिला अधिकाऱ्याची फेसबुकवर आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. काही काळाने ती मैत्री आणखी घट्ट झाली. त्यातून आरोपीने महिलेला एका ठिकाणी बोलावले. तेथे गुंगीचे औषध देऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने याचे व्हिडीओही तयार केले होते. या व्हिडीओच्या साह्याने तो महिला अधिकाऱ्याला धमकावत होता. त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच, पैशाचीही मागणी केली. 

हेही वाचा : युती सरकारमध्ये शिवसेना गुलाम होती; संजय राऊतांची कबुली 

या प्रकरणात आरोपीच्या दोन मित्रांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकावले होते. त्यामुळे या दोघांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व त्रासातून महिला अधिकारी बाहेर पडली होती. नंतर आरोपीने महिलेच्या होणाऱ्या पतीलाही फोन करूनही तिची बदनामी केली. यामुळे अखेर या महिला अधिकाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी तो मेघवाडी येथे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख