शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचाय; अंबादास दानवेंच गायकवाडांना प्रत्युत्तर

Ambadas Danave | Shivsena| शिंदे गट आणि शिवसैनिकांमधील राड्यानंतर बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी " चून चून के गिण गीण के मारे जायंगे, अशी थेट धमकीच दिली होती.
Ambadas Danave | Shivsena|
Ambadas Danave | Shivsena|

मुंबई : दोन दिवसांपूर्वी बुलडाण्यामध्ये शिवसेना (Shivsena) आणि शिंदे (Eknath Shinde Group) गटातील कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा झाल्याची बातमी समोर आली होती. या राड्यानंतर बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनीदेखील शिवसेनेतील पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांबद्दल पातळी सोडून बोलत असतील तर " चून चून के गिण गीण के मारे जायंगे, अशी थेट धमकीच बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी दिली. या धमकीला शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचा आहे. हिंमत असेल तर भ्याडपणाने बोलण्यापेक्षा समोर या”, असे खुले आव्हान त्यांनी आमदार गायकवाडांना दिलं आहे. गायकवाड यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी भ्याडपणाने बोलण्यापेक्षा समोर येऊन बोलावं. मग त्यांना कळेल कोण चून चून के मारेल आणि कोण गिन गिन के मारेल”, असा इशारा अंबादास दानवेंनी गायकवाडांना दिला आहे.

Ambadas Danave | Shivsena|
चून चून के मारे जायंगे; बुलडाण्यातील राड्यानंतर आमदार गायकवाडांची शिवसेनेला थेट धमकी

काय आहे प्रकरण, काय म्हणाले होते संजय गायकवाड?

बुलडाण्यात शिवसेनेतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यातच आला होता. मात्र या कार्यक्रमात बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम चालु असताना, आमच्या नेत्यांवर टीका का करता, असे म्हणत या कार्यक्रमात राडा करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. खुर्च्यांची तोडफोड करत हा कार्यक्रम उधळून लावला.

यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. राड्याआधी पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची पण झाली. खुर्च्यांची तोडफोड करत कुणाल गायकवाड आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळून लावण्यात आला. धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या समोरच हा सगळा राडा झाला.

या राड्यानंतर पुन्हा संजय गायकवाड यांनीही धमकी दिली. शिवसेनेतील पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांबद्दल पातळी सोडून बोलत असतील तर " चून चून के गिण गीण के मारे जायंगे, अशी थेट धमकीच बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे." इतकेच नव्हे तर, पोलीस होते म्हणून कालच्या राड्यात कमी झाले, मात्र पुढच्या वेळी आणखी जास्त राडा होईल" असा इशारा ही गायकवाड यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com