रामराजे नाईक निंबाळकर अन् उमा खापरे डेंजर झोनमध्ये? एक-एक मत बाद

Legislative Council Election Results Live Update : विधान परिषद निवडणूक निकाल
Ramraje Naik Nimbalkar, Uma Khapre
Ramraje Naik Nimbalkar, Uma Khapresarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या कोट्यातील एका मतावर भाजपने (BJP) आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीच्या एका मतावर भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आक्षेप घेतला आहे. तर भाजपच्या उमेदवार उमा खापरे (Uma Khapre) यांना पडलेल्या पहिल्या पसंतीच्या मतावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे.

ही दोन्ही मते बाद झाली आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. ही दोन्ही मत बाजूला ठेवण्यात आली आहेत. निवडणुकीमध्ये २८५ आमदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये दोन मते बाद झाल्यामुळे २८३ मते वैध ठरली आहेत. आता मतांचा कोटाही कमी झाली आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Uma Khapre
पुढचा मुख्यमंत्री अपक्ष, छोट्या पक्षाचे आमदार ठरवतील ; कदाचित तो प्रहारचा असेल..

रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील ज्या मतावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यात तिसऱ्या पसंतीच्या मतावर आक्षेप आहे. तर उमा खापरे यांच्या कोट्यातील बाद झालेले मत हे पहिल्या पसंतीचे आहे. या मतावरुन भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या बाबतचा निर्णय थेट निवडणूक आयोग घेणार आहे. दिल्लीपर्यंत साऱ्या घडामोडी पोहोचणार असल्याचे दिसून येत आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Uma Khapre
Bjp : गिरीश महाजन म्हणाले, काॅंग्रेसचा आक्षेप म्हणजे बालिशपणाचे लक्षण

दरम्यान, या आधी काँग्रेसने भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या मतावर आक्षेप घेतला होता. तो आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळला होता. त्यानंतर मत मोजणी सुरु झाली होती. त्यानंतर वैध आणि अवैध मते ठरवताना दोन मतांवर आक्षेप घेण्यात आला. ते दोन्ही मत बाद ठरवण्यात आली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com