'फडणवीसच एक दिवस मुख्यमंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार'

Sushma Andhare | टीम देवेंद्र हे एक मायाजाल आहे, मोहजाल आहे. या मायाजालातून त्यांनी बाहेर पडण गरजेच आहे
Cm Eknath Shinde| Devendra Fadanvis
Cm Eknath Shinde| Devendra Fadanvis

Sushma Andhare मुबंई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा करेक्ट कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करणार, असा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. राज्यातील सत्तांतरांच्या घटनाक्रम संपुर्ण राज्यातील जनतेने पाहिला. शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली खरी पण तेव्हापासूनच हे आमदार फुटणार, हे सरकार कोळणार असे अनेक दावे विरोधकांकडून केले जात आहेत. असे असतानाच आता सुषमा अंधारे यांनीही असंच विधान केलं आहे.

टीम देवेंद्र हे एक मायाजाल आहे, मोहजाल आहे. या मायाजालातून त्यांनी बाहेर पडण गरजेच आहे. कारण टीम देवेंद्र आणि भाजपचा इतिहास आहे, त्यांनी आतापर्यंत ज्यांच्याज्यांच्याशी युती केली तो युतीधर्म त्यांनी कधीच पाळला नाही. मग ते नितीशकुमार असोत की इकडे शिवसेना असो. ते ज्यांच्याशी युती करतात त्यांनाच संपवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते ४० आमच्या शिंदे साहेबांना आणि त्या ३९ आमदारांना सोबत घेऊन जात असले तरी ते त्यांचा उत्कर्ष करत आहेत, असे होत नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वत: च म्हटलंय, त्यांनी जो मनावर एवढा मोठा दगड ठेवला आहे ना तो योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करण्यासाठीच ठेवला आहे. असा सुचक इशारा अंधारे यानी शिंदे गटाला दिला आहे,

Cm Eknath Shinde| Devendra Fadanvis
'आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय'

ज्या दिवशी फडणवीस यांना असं वाटेल की एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम करण्याची वेळ आली आहे, त्या दिवशी ते त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणारच आहेत. कारण फडणवीस यांचे आतापर्यंतचे राजकारण हे द्वेषमुलकच राहिले आहे. इतकेच नव्हे तर एकनाथ शिंदे हे कसे अकार्यक्षम आहेत हे सांगण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असतात. मी बोलले होते, फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक काढुन घेतात, त्यांच्याकडे चिठ्ठ्या सरकवतात, गिरीश महाजन यांच्यासारखा सुमार बुद्ध्यांक असणारा माणुस त्यांना पेपर आडून सुचवू पाहतो. हे काही फक्त टिंगलीचे विषय नाही, फडणवीस आणि भाजप जाणीवपुर्वक शिंदे साहेबांच्या विरोधात षडयंत्र रचत आहेत, जाणीवपुर्वक त्यांच्याविरोधात एक नॅरेटिव्ह सेट करत आहेत की पहा, महाराष्ट्राला ब्राम्हणेतर मुख्यमंत्री हवा होता म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, पण पहा मराठा नेतृत्त्वाला बुध्यांकच नाहीये, मराठा नेतृत्त्वाला मुख्यमंत्रीपद पेलण्याची क्षमताच नाहीये, असे नॅरेटिव्ह ते सेट करत आहेत, जे अत्यंत वाईट आहे, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in