Shivjayanti : इस्राईलच्या राजदुतांनाही शिवरायांचा मोह; अशी दिली मानवंदना

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशातील अनेक भागात शिवजयंतीचा उत्सव साजरा होत आहे.
Israeli Diplomats in Mumbai
Israeli Diplomats in MumbaiSarkarnama

Shivjayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशातील अनेक भागात शिवजयंतीचा उत्सव साजरा होत आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईतील इस्राईलचे राजदूत कोबी शोशनी यांच्यावतीने शिवजयंती शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. इस्राईलच्या दुतावासाने एक ट्विट करत शिवजयंतीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये राज्यातील शिवजयंती सोहळ्याचा व्हिडीओ ट्विट करत या व्हिडीओच्या माध्यमातून इस्राईलच्या राजदुतांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, राज्यात आज (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Shiv Jayanti 2023) उत्साहात साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा,आमदार प्रविण दरेकर आदी उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच शिवनेरीवर शिवजयंती साजरी करीत आहेत.

Israeli Diplomats in Mumbai
Chhatrapati Shivaji Maharaj; महाराजांच्या सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळीचा विश्वविक्रम!

त्याचबरोबर दिल्लीच्या लाल किल्ल्यात औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजेंना कैद केले होते त्या आग्र्याच्या किल्ल्यात आज इतिहासात पहिल्यांदाच शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून १० हजार शिवभक्त दिल्लीत दाखल झाले आहेत मात्र सुरक्षेच्या कारणास्तव किल्ल्यात केवळ ४०० शिवभक्तांना प्रवेश मिळणार आहे. शिवजयंती निमित्त लाल किल्ल्यावर शिवरायांच्या शौर्यावर आधारित नाटक आणि विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान व आर. आर. पाटील फाउंडेशनच्या वतीने लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com