ईडीवर न्यायालयाचे ताशेरे; संजय राऊतांची अटकच बेकायदेशीर

Sanjay Raut Latest News : न्यायालयाने दिलेल्या निकालात धक्कादायक खुलासा केला आहे
Sanjay Raut News
Sanjay Raut News Sarkarnama

Sanjay Raut Latest News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने दिलेल्या अंतरीम निकालपत्रात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे नमुद केले आहे.

या मुळे संजय राऊत यांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. केंद्र सरकारकडून विरोधी पक्षांच्या नेत्यावर कारवाई करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. राऊत यांच्या संदर्भात निकाल देताना न्यायालयाने अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटल्यामुळे विरोधकांच्या आरोपांना बळ मिळाले आहे. यावरुन आता वेगळेच राजकारण रंगणार आहे.

Sanjay Raut News
जामीन मंजूर होताच राऊत आधी गोंधळले, मग भावूक झाले अन् पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले...

न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणातील म्हाडाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. तरीही म्हाडाचा कुठलाही कर्मचारी आरोपी नाही. मात्र, प्रवीण राऊत यांना दिवाणी वादासाठी अटक केली आहे. जबाबदार एचडीआयएल, म्हाडा आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई केलीली नाही. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी वाधवान बंधू यांना देखील अटक केलेली नाही. तसेच प्रवीण राऊत यांना देखील दिवाणी वादासाठी अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांना अटक करण्यात आली. मात्र, ही अटक बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मुख्य आरोपांनी सोडले, आणि इतरांनाच अटक केली, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

राऊतांच्या जामीन अर्जावर आज (ता. ९) मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएल कोर्टाने निकाल दिला. त्या वेळी सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागले होते. राऊतांना जामीन मंजूर होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मात्र, त्यावेळी राऊत मात्र याबाबत गोंधळात पडले. त्यांना काही क्षण काय झाले, हेच लवकर कळाले नाही. त्या वेळी त्यांच्या वकिलांनी त्यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती दिली.

Sanjay Raut News
संजय राऊतांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा; जामिनाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार...

विशेष न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने ईडीला फटकारले. मुंबई उच्च न्यायालयात तातडीने या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच कार्यालयीन प्रक्रियेच्या विरोधात जाऊन सुनावनी करू शकत नाही, असेही सांगितले. उदया सकाळी या जामीनासंदर्भात सुनावनी करु, असेही न्यायालयाने सांगितले. सत्र न्यायालायने महिनाभर ऐकून निर्णय दिला आहे. त्यावर १० मिनिटात निर्णय देण योग्य नाही, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच तुम्ही गुणवत्तेच्या आधारावर युक्तीवाद करा. एका दिवसाने काय होणार आहे, असा सवाल उच्च न्यायालयाने ईडीला केला. या प्रकरमाणुळे पुन्हा एकादा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in