निवडणुकांसाठी राष्ट्रवादी `अॅक्शन मोड`वर : सेना आणि काँग्रेसला सोबत घ्या, पवारांचा आदेश

सुप्रीम कोर्टाच्या निणर्यानंतर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे पहावे लागणार आहे,असे मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.
निवडणुकांसाठी राष्ट्रवादी `अॅक्शन मोड`वर : सेना आणि काँग्रेसला सोबत घ्या, पवारांचा आदेश
Jayant Patil, Sharad PawarSarkarnama

मुंबई : राज्यातील सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचा (Local Bodies election) कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज (ता.4 मे) दिला. यामुळे सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत. आज मुंबई येथील वाय बी चव्हाण प्रतिष्ठान सेंटर येथे राष्ट्रवादी कॅाग्रेस (NCP) पक्षाची बैठक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी पक्षाचे आमदार, खासदार आणि मंत्री उपस्थित होते. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूका लढवाव्या,असा पवार साहेबांनी आदेश दिला, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे.

Jayant Patil,  Sharad Pawar
पावसाळ्यात निवडणुका कश्या घेणार? : थोरातांचा सवाल

आव्हाड म्हणाले की, आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत चर्चा झाली. आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत असलेल्या तिन्ही पक्ष शिवसेना, कॅाग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मिळून ही निवडणुक लढवावी, असा आदेश शरद पवार साहेबांनी या बैठकीत दिला आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या निणर्यानंतर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे पहावे लागणार असल्याचे आव्हाड म्हणाले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बैठकीनंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निवडणुकांबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली असून आगामी निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढविण्याबाबत आणि खासदार, मंत्री, आमदार यांना स्थानिक पातळीवर निवडणुकांसाठी एकत्र कसे येईल हे पहावे अशीही चर्चा बैठकीत झाली आहे. ओबीसी आरक्षण मिळावे ही महाविकास आघाडीची भूमिका होती. असे सांगतानाच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच निर्णय घेतील, असे पाटलांनी स्पष्ट केले.

Jayant Patil,  Sharad Pawar
सर्वोच्च न्यायालयात मांडलेली बाजू ओबीसींना न्याय देण्याइतपत सक्षम नव्हती...

दरम्यान, आजच्या मनसेच्या आंदोलबाबत बोलतांना पाटील म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था टिकावी यासाठी आवश्यक ती खबरदारी व काळजी घेण्याची गृहमंत्र्यांनी व्यवस्था केली होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रश्न येत नाही. आज भोंग्यांचे आवाज कमी झाले कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सरकारने चालणे गरजेचे आहे. सरकारची तीच भूमिका होती. त्याच पध्दतीने ठराविक डेसीबलच्या खाली भोंग्यांचे आवाज यावेत ही व्यवस्था आहे. मात्र एक गोष्ट विसरता येणार नाही. गावोगावी सांस्कृतिक कार्यक्रम असतात, सण असतात. त्या सगळ्या सणांच्याबाबत भोंग्याच्या आवाजाची मर्यादा सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या चौकटीत असणेही आवश्यक आहे, असेही पाटलांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.