ओमिक्रोनबाबतच्या कडक नियमावलीबाबत अजितदादा म्हणाले..

''केंद्राने आणि डब्ल्यूएचओने याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची नितांत गरज आहे. देशपातळीवर आरोग्य विभाग आणि डब्ल्यूएचओ नवं नियमांबाबत एक सूचना काढणं गरजेचं आहे,'' असे अजित पवार (ajit pawar) म्हणाले.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

मुंबई :ओमिक्रोन (Omicron) या कोरोनाच्या (Corona) नव्या विषाणुने राज्याची चिंता वाढवली आहे. ओमिक्रोनचे राज्यात आता ९ रुग्ण झाले आहेत. रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) ६ रुग्ण आढळले आहेत. पुण्यामध्ये १ रुग्ण आढळून आला आहे. कल्याण डोंबिवलीमध्येही २ रुग्ण पॅाझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडे टेन्शन वाढले आहे. लॅकाडाऊनमधून आताच कुठे राज्याने मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली होती. त्यातच आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.

''ओमिक्रोनबाबत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. सध्या वेगवेगळ्या देशातून जे येत आहेत त्यांच्याबाबत कडक भूमिका केंद्राने घ्यायला हवं. सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळवर नियमांचं पालन होतं आहे की नाही याकडे लक्ष द्यायला हवं,'' असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी सांगितले. भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त पवार यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे( Uddhav Thackeray) यांची तब्ब्येत बरी नसल्याने ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही,'' असे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ''डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने राज्याला पूढे घेऊन आम्ही जात आहोत. कुठल्याही भूमिकेकडे राजकीय पद्धतीने बघता नये हे बाबासाहेब आंबेडकर यांनी विश्वाला सांगितले आहे.

अजित पवार म्हणाले, ''आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियमांचं पालन होतं आहे की नाही, याकडे लक्ष द्यायला हवं. कारण कोरोनाची सुरुवात मुळात भारतात एक जोडपं दुबई वरून आलं होतं आणि त्यांनी प्रवास केल्यानंतर त्यांच्या सोबतच्या ड्राइव्हरला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याचा प्रसार झाला होता. आत्ताच्या देखील काळात वेगवेगळ्या राज्यात एक दोन रुग्ण सापडत आहेत. पुण्यात जे कुटुंबीय बाधित आहेत त्यामध्ये लहान मुलांना बाधा झाली आहे. त्यामुळे केंद्राने आणि डब्ल्यूएचओने याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची नितांत गरज आहे. देशपातळीवर आरोग्य विभाग आणि डब्ल्यूएचओ नवं नियमांबाबत एक सूचना काढणं गरजेचं आहे. जे दोन डोस घेतलेले आहेत त्यांना लागण झाली आहे. त्यामुळे बूस्टर डोस बाबत देखील केंद्राने निर्णय घ्यायला हवा. आपल्याकडे बूस्टर डोस उपलब्ध आहेत,'

Ajit Pawar
बदली केल्यानेच परमबीर सिंहांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र!

''राजकीय लोकांच्या लग्नात प्रचंड गर्दी पाहिला मिळाली. लोकं अजिबात ऐकत नाहीत. त्यामुळे देशपातळीवर नियमांबाबत निर्णय झाला तर प्रत्येक राज्य त्याची अंमलबजावणी करेल. बूस्टर डोस बाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे ज्यांनी याबाबत संशोधन केले आहे त्यांनी बूस्टर डोस घ्यायचा का नाही ते स्पष्ट करावे, बुस्टर डोस का घेण्यात यावा किंवा का घेण्यात येऊ नये, याचं कारण देखील स्पष्ट करावं,'' असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

''राजकीय लोकांच्या लग्नात प्रचंड गर्दी पाहिला मिळाली, देशपातळीवर कोरोना नियमांबाबत निर्णय झाला तर प्रत्येक राज्य त्याची अंमलबजावणी करेल,'' असे त्यांनी सांगितले. ''कोरोना नियमांचे पालन होत की नाही हे पाहत आहोत, केंद्राने देखील याबाबतचे नियम कठोर केले पाहिजे. मास्क वापरण्याबाबत देशपातळीवर आरोग्य विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे,'' असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com