Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत फडणवीसांचं महत्त्वाचं विधान!

Pension News: ही धमक फक्त आमच्यातच!
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Old Pension Scheme News: जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी शासकीय कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसांपासून केली आहे. यासाठी मागील हिवाळी अधिवेशनादरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोर्चा ही काढला होता. यानंतर जुनी पेन्शन योजनेची चर्चा राज्यभरात सुरु झाली. आता उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.

"जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत आम्ह नकारात्मक नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. याबाबत फडणवीसांचं मोठं विधान मानण्यात येत आहे. जुनी पेन्शन योजना जर पुन्हा सुरू केली तर आठ वर्षात अतिरीक्त अडीच लाख कोटींचा भार सरकारवर पडेल," फडणवीस यांनी म्हंटलंय.

Devendra Fadnavis
Sangli News: गोपीचंद पडळकरांच्या बंधूंना झटका, मिरजेतील 'त्या' वादग्रस्त जागेबाबत मोठा निर्णय

फडणवीस म्हणाले, ठअर्थव्यवस्थेच्या टक्केवारीमध्ये जुनी पेंशन योजनेचा भार फार मोठा असणार नाही. म्हणून मी हे स्पष्ट सांगतो. आम्ही ही पेंशन योजना राबण्यासाठी कुठेही नकारात्मक नाही. आणि यामध्ये सर्वांशी चर्चा करून, आर्थिक दृष्टीकोनातून चर्चा करून काय मार्ग निघू शकतो. पण दीर्घकालीन मार्ग आपल्याला काढावा लागेल. तात्पुरता मार्ग काढून आपल्याला चालणार नाही," असं महत्त्वपूर्ण विधान फडणवीसांनी केले आहे.

Devendra Fadnavis
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू होणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं..

"काही लोक यावरती बोलतात, पण पेंशन योजनेत बदल करायचा असेल, जुनी पेंशन योजना राबवायची असेल तर ही धमक आमच्यामध्येच आहे. बाकीचे लोक नाही करू शकणार. बाकी फक्त बोलणारे लोक आहेत," असे फडणवीसांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com