Kumar Ketkar on Patole: कामाची वेळ पाळा नाहीतर 2024 मध्ये...; कुमार केतकरांनी टोचले नाना पटोलेंचे कान

Congress : कुमार केतकरांनी कार्यक्रमाला उशीरा येणाऱ्या काँग्रेस नेत्यांना सुनावलं...
Kumar Ketkar on Patole
Kumar Ketkar on PatoleSarkarnama

Dombivli : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे कार्यक्रमाला उशिरा आल्यामुळे खासदार कुमार केतकर यांनी त्यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. "आपल्याला वेळ पाळावी लागेल नाहीतर 2024 मध्ये मोदींचं सरकार येईल", असा टोला त्यांनी लगावला.

"काँग्रेस पक्ष हा पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा पक्ष आहे. त्यांची लोकप्रियता आपल्यापेक्षा जास्त आहे. ते प्रत्येक ठिकाणी वेळेवर यायचे. आपल्याला देखील वेळ पाळावी लागेल नाहीतर 2024 मध्ये मोदींचं सरकार येईल आणि त्याच्यानंतर आपण दोन तासांनी पोहोचू", असे खडे बोल काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी नाना पटोले यांच्यासह स्थानिक नेत्यांचे कान टोचले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने 'हाथ से हाथ जोडो' या अभियानचे डोंबिवलीत आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी तब्बल दोन तास उशिराने पोहोचले. या कार्यक्रमाला खासदार कुमार केतकरही उपस्थित होते. यावेळी कुमार केतकर यांनी या कार्यक्रमाला लेट येणाऱ्या नेत्यांचे चांगलेच कान टोचले.

Kumar Ketkar on Patole
Ashish Deshmukh News: काँग्रेसने निलंबित केलेले आशिष देखमुख अमित शाहांना भेटणार !

केतकर म्हणाले, "पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींची लोकप्रियता नाना पटोले आणि कुमार केतकर यांच्यापेक्षा जास्त होती. मात्र, तरी देखील ते प्रत्येक ठिकाणी वेळेवर यायचे. त्यामुळे या पुढे कायम वेळ पाळावी लागेल. नाहीतर 2024 मध्ये मोदींचं सरकार येईल आणि त्याच्यानंतर आपण दोन तासांनी पोहोचू", असं म्हणत कुमार केतकर यांनी नाना पटोले यांच्यासह स्थानिक नेत्यांना टोला लगावला.

Kumar Ketkar on Patole
Ahmednagar Politics: फडणवीसांच्या शेजारच्या खुर्चीवर विखे बसले अन्‌ राम शिंदे व्यासपीठावरून खाली निघाले; पण....

ते पुढे म्हणाले, "2024 ला असा टाईमाचा घोटाळा करून चालणार नाही. 2024 ची निवडणूक जिंकायची असेल तर आपल्याला आजपासून दररोज टाईम पाळावा लागेल. ज्यांनी- ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या शपथा घेतल्या ते सगळे काँग्रेस सोडून गेले. आपल्यापैकी कुणी सोडून गेलं नाही, आपल्या कुणाच्याही घरी ईडी,'सीबीआय'वाले आले नाहीत कारण आपण काही केलेलं नाही", असंही ते यावेळी म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in