ओबीसी, पूरग्रस्त आणि संजय राऊत.. यावर फडणवीस यांची महत्वाची घोषणा

राज्य व देशातील घडामोडींवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
Devendra Fadnavis News, Political News in Marathi, Ashish Shelar News
Devendra Fadnavis News, Political News in Marathi, Ashish Shelar NewsSarkarnama

मुंबई - राज्य व देशातील घडामोडींवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. मंत्रालयात त्यांनी उपस्थिती पत्रकारांशी संवाद साधताना 91 नगरपालिकांतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. ( OBCs in 91 municipalities will go to Supreme Court for reservation... )

देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सांगितले की, 91 नगरपालिकांना ओबीसी आरक्षण का लागू होत नाही. आज न्यायालयाने राज्यातील घोषित निवडणूक कार्यक्रमात सुधार करण्यामध्ये नकार दिला. राज्यात 400 नागरी संस्था आहेत त्यातील 91 सोडून सर्वाना आरक्षण लागू आहे. आम्ही पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. 91 नगरपालिकांतील ओबीसी आरक्षणासाठी पुन्हा एकदा आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis News, Political News in Marathi, Ashish Shelar News
sanjay raut video : देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांचं चॅलेंज

ते पुढे म्हणाले की, माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं आहे. आम्ही रिव्ह्यू पिटीशन दाखल करू. आज न्यायालयाने ही भूमिका का घेतली याचे आश्चर्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने जी भूमिका घेतली त्यावरून राज्यातल्या 29 हजार ग्रामपंचायत 34 जिल्हा परिषदा आणि 300 पेक्षा जास्त नगरपालिका यांना आरक्षण दिले मग या 91 नगरपालिका का बाजूला ठेवता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

संसदेत काँग्रेस खासदार चौधरी यांनी राष्ट्रपती मुर्मु यांच्या बाबत वापरलेल्या चुकीच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, द्रौपदी मुर्मु यांच्याबद्दल केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. त्याचा अवमान करता तेव्हा एक चुकीचा संदेश जातो यामुळे देशाची प्रतिमा खराब होत आहे, असे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis News, Political News in Marathi, Ashish Shelar News
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यावेळी रिस्पॉन्स टाइम चांगला राहिला...

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अतिवृष्टी झालेल्या भागातील दौऱ्यावर बाबत त्यांनी सांगितले की, अतिवृष्टी व पूरग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांच्या सरकारसारखे आमचे सरकार नाही तात्काळ मदत मिळेल. आठवड्या भरात 100 टक्के पंचनामे होती आणि त्यानंतर आम्ही मदत करू. महायुतीचे सरकार केंद्राची वाट न बघता मदत करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis News, Political News in Marathi, Ashish Shelar News
गडाख, भांगरे, जगताप, शेलार, राऊत, परजणे, वाकचौरेंसह अनेक दिग्गजांना फटका

संजय राऊतांच्या तोंडच्या वाफा

जे सत्ता येईल असेल बोलतात ते किती भाबडे आहेत. त्यांच्यावर बोलणे म्हणजे तोंडाची वाफ घालावायची आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत मला विचारू नका, असे नाव न घेता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांनी टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in