भाजप सरकारच्या 'त्या' कृतीमुळे बहुजन समाज आरक्षणापासून मुकणार!

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात EWS घटकांबाबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पाच एकरपेक्षा जास्त जमीनधारक आता आरक्षणास पात्र राहणार नाहीत.
PM Narendra Modi 

PM Narendra Modi 

मुंबई: भारतीय जनता पक्षाला (BJP) भरगोस मतदान करून बहुजन समाजाने केंद्रात सत्ता दिली, पण आता तेच भाजप सरकार बहुजन समाजाच्या मुळावर उठले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, केंद्र सरकारच्या या भुमिकेमुळे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणानंतर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकही (EWS quota ) आता आरक्षणास मुकणार आहे. बहुजन समाजास आरक्षणापासून वंचित ठेवून हळूहळू सर्वच समाजाचे आरक्षण संपुष्टात आणण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर केंद्रातील मोदी सरकार काम करत असल्याची टीकाही अतूल लोंढे यांनी केली आहे.

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात EWS घटकांबाबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पाच एकरपेक्षा जास्त जमीनधारक आता आरक्षणास पात्र राहणार नाहीत, त्यांना आरक्षण मिळणार नाही. त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भात पाच एकरापेक्षा जास्त जमीनधारक परंतु कोरडवाहू जमीन असलेला, आत्महत्याग्रस्त गरिब शेतकरी, बहुजन घरातील मुलेही आता आरक्षणास पात्र राहणार नाहीत. भाजप सरकारच्या या कृतीमुळे प्रत्येक समाज घटकाचे आरक्षण गेले पाहिजे ही उघड करणारी आहे, हे स्पष्ट झाले आहे. भाजपाचा बहुजन विरोधी चेहरा उघड झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

<div class="paragraphs"><p>PM Narendra Modi&nbsp;</p></div>
पुणे-मुंबईसोबतच नाशिकलाही कोरोनाचा ॲलर्ट

केंद्रातील भाजप सरकारने ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणारा इम्पिरीकल डाटा दिला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण संकटात आले आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकाही ओबीसींचे आरक्षण वगळून झाल्या. तीच परिस्थिती आता मध्यप्रदेश आणि ओडिसातही निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने ५० टक्यांवरील आरक्षणास मान्यता न दिल्याने आता EWS घटकांचे आरक्षण संपुष्टात आले आहे. ईड्ब्ल्यूएसमधून आरक्षण घेण्यास जो मराठा समाज पात्र होता, त्या मराठा समजालाही आता आरक्षण मिळणार नाही. यातून भाजपाचा आरक्षणविरोधी चेहरा यातून स्पष्ट झाला असून बहुजन समाजाने भाजपाचे हा ढोंगी चेहरा ओळखावा व वेळीच सावध व्हावे, असे आवाहनही लोंढे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in