ओ युवराज, बारामतीच तुमची जहागिरी आणि तेच तुमचं विश्व : सातपुतेंचा रोहित पवारांना टोला

Ram Satpute : हजारो कोटींचा निधी ओरबाडून फक्त बारामतीला घेऊन गेल्यावर थोडं फार तर दिसेलच ना ?
Ram Satpute
Ram SatputeSarkarnama

मुंबई : मागील काही दिवसांपासून बारामती मतदारसंघावरून राजकीय वर्तुळात चर्चा घडून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखण्यात येत आहे. नुकताच बारामती मतदारसंघात भाजपचे (BJP) नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा ६ सप्टेंबर रोजी बारामती दौरा झाला आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती. आता माळशिरस मतदारसंघाचे भाजपचे आमदार राम सातपुते यांनी ट्विट करत रोहित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

आमदार राम सातपुते यांनी रोहीत पवारांच्चा उल्लेख युवराज असा केला आहे. हजारो कोटींचा निधी ओरबाडला असा आरोप करत, बारामती शहर हीच तुमची जहागिरी आणि तेच तुमचं विश्व आहे, असा टोला ही लगावला आहे. सातपुते ट्विट करत म्हणाले की, "ओ युवराज बारामती हाच महाराष्ट्र आणि देश मानून हजारो कोटींचा निधी ओरबाडून फक्त बारामतीला घेऊन गेल्यावर थोडं फार तर दिसेलच ना ? पण बाकी महाराष्ट्राचं काय ? बारामती शहर हीच तुमची जहागिरी आणि तेच तुमचं विश्व आहे."

Ram Satpute
Rohit Pawar : भाजप नेत्यांनो, बारामती या, विकास बघा ; पवारांचे बावनकुळेंना सडेतोड उत्तर

दरम्यान रोहीत पवार यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी भाजप आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती. रोहीत पवार म्हणाले होते की, "मी गणपती बाप्पांकडे सत्तेची प्रार्थना केली नाही. मात्र, राजकारणाची पातळी खाली जात आहे. लोकांच्या विकासावर राजकारण व्हावे. सुडाचे राजकारण थांबवावे. भावनिक विषयांवर राजकारण न होता विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण व्हावे. भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलेच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवे."

Ram Satpute
Sunil Raut : दिल्लीत राजकीय भेटीसाठी आलो नाही ; राऊतांचा दावा

"आज बारामती पवार मुक्त करायची, मुंबई ठाकरे मुक्त करायची या दोन विषयांवर भाजपाचे राजकारण केंद्रीत आहे. मात्र, सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणे, शेतकर्‍यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत. बारामतीच्या लोकांवर आमचा विश्वास आहे. तिथले लोक कोणत्या बाजूचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत, हे आम्हाला माहिती आहे," असे रोहित पवार यांनी म्हंटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com