तुम्ही व्हीआयपी नाही! शेअर बाजाराच्या माजी प्रमुखांना न्यायालयानं सुनावलं

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या तत्कालीन प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयने अटक केली आहे.
NSE Former CEO Chitra Ramkrishna
NSE Former CEO Chitra Ramkrishna

नवी दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दणका दिला असून, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांना घरचे जेवण देण्याची विनंती न्यायालयाने फेटाळली आहे. याचबरोबर न्यायालयाने त्यांना फटकारलेही आहे. (Share Market News)

चित्रा रामकृष्ण यांनी सीबीआय चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिली होती. त्या तपासात सहकार्य करीत नव्हत्या. यामुळे अखेर रामकृष्ण यांना सीबीआयने अटक केली होती. त्या सीबीआय कोठडीत होत्या. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रामकृष्ण यांनी घरचे जेवण मिळावे, अशी मागणी न्यायालयात केली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. तुम्ही व्हीआयपी कैदी नाही. प्रत्येक कैदी समान आहे, असेही न्यायालयाने फटकारले. त्यांना हनुमान चालिसा आणि भगवद्गीता या ग्रंथांची प्रत जवळ बाळगण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

NSE Former CEO Chitra Ramkrishna
भाजपचं पुढचं टार्गेट ठरलं; 'यूपी'त विजय मिळवून देणाऱ्या टीमवर दुसरी मोठी जबाबदारी

काही दिवसांपूर्वी रामकृष्ण यांच्यावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. नंतर त्यांची सीबीआयने चौकशी केली होती. रामकृष्ण यांच्या भोवतीचा केंद्रीय तपास यंत्रणांनी फास आवळला आहे. सीबीआयने रामकृष्ण यांच्यासह एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण आणि माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावली आहे. यामुळे त्यांना आता परदेशात पलायन करता येणार नाही. रामकृष्ण यांच्या संपत्तीसह कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांनी गोपनीय माहिती योगीला दिल्याचा दाट संशय आहे.

NSE Former CEO Chitra Ramkrishna
पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच! नाना पटोलेंचं मोठं भाकीत

या प्रकरणी ‘एनएसई’चे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम (Anand Subramanian) यांना सीबीआयने 24 फेब्रुवारीला अटक केली आहे. सीबीआयने त्यांची तीन दिवस चौकशी केली होती. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तोच कथित योगी असल्याचेही स्पष्ट झाले होते. तोच योगी बनून चित्रा यांच्याशी ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधत होता. सुब्रह्मण्यम यांची एनएसईमध्ये नियुक्ती ही चित्रा यांनी योगीच्या सांगण्यावरून घेतलेल्या वादग्रस्त निर्णय होता. तसेच, वेतन देतानाही अनियमितता दिसून आली आहे, असे सेबीच्या चौकशीत समोर आलं होतं. (Share Market Updates)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com