Thackeray vs Shinde Group : "आता प्रेमाचा 'व्हीप', दोन आठवड्यानंतर मात्र..."; शिवसेनेचा ठाकरे गटास इशारा

Shivsena Whip : कोबंडीची हुल म्हणत ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या 'व्हीप'ची खिल्ली
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama

Maharashtra Politics : शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी ठाकरे गटातील आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यावर ठाकरे गटाने व्हीप मिळालाच नाही, असे ठासून सांगत धुडकाविला आहे. हा व्हीप म्हणजे कोंबडीची हूल आहे. त्यास आम्ही घाबरत नाही, असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले. त्यावर शिवसेनेचे गोगावले यांनी दोन आठवड्यानंतर सावध राहण्याचा गर्भित इशारा दिला आहे.

शिवसेनेकडून (Shivsena) रविवारी शिवसेनेच्या सर्व ५६ आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. या ५६ आमदारांमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचाही समावेश आहे. पण हा व्हीप आम्हाला मिळालाच नाही, असे ठाकरे गटाच्या आमदारांनी सांगितले.

ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) म्हणाले, "आम्हाला कोणालाही व्हीप मिळालेला नाही. आम्हाला शिवसेना व्हीप बजावू शकत नाही. त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात व्हीप न बजावण्याचे मान्य केले होते. त्यांनी असे केले तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ."

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Raut-shirsat Meeting : खासदार संजय राऊत-आमदार संजय शिरसाट यांची भेट : शिरसाट म्हणतात...

आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनीही या व्हीपवरून शिवसेनेची खिल्ली उडविली. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचल्यानंतरही घाबरलो नाही. आता व्हीप बजावून घाबरविण्याचे प्रयत्न करू नयेत. हा व्हीप म्हणजे कोंबडीची हूल आहे. ठाकरे गटाने शिवसेनेचा व्हीप धुडकावून लावलेला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांकडून हा व्हीप मानणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Grampanchayat News : गायरान जमीनीवरील अतिक्रमण भोवले, महिलेचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द..

यावर गोगावले म्हणाले, "शिवसेना (Shivsena) पक्ष या नात्याने आम्ही त्यांना व्हीप (Whip) दिला आहे. धनुष्यबाण चिन्हावर ५६ आमदार निवडून आले आहेत, त्यांना तो व्हीप लागू होतो. त्यांनी घ्यायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार आम्ही दोन आठवडे त्यांच्यावर कारवाई करणार नाही. दोन आठवड्यानंतर त्यांनी सावधपणे चालावे."

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Budget : सभागृहाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी फडणवीसांचे खडे बोल तर अजितदादांची सूचना; नेमकं काय घडलं?

यानंतर गोगावले यांनी नियमानुसार ठाकरे गटावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. गोगावले म्हणाले, "सर्व आमदारांना हा व्हीप प्रेमाने दिला आहे. व्हीपनुसार सर्वांनी प्रतिसाद देणे गरजेचे आहे. ठाकरे गटाने व्हीपला प्रतिसाद दिला नाही तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. व्हीपचा अवमान केल्याच्या अटी, शर्थीनुसार पुढचे पाऊल उचलण्यात येईल."

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Maharashtra Budget : शिवसेना-भाजपची पुढील रणनिती तयार; गोगावले म्हणाले...

मिलींद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्याबद्दल गोगावले यांनी स्पष्ट मत मांडले. ते म्हणाले, "नार्वेकर अनेक वर्षे आमदार होण्याची वाट पाहत आहेत. त्यांच्याबाबत मात्र उद्धवसाहेब सकारात्मक नाहीत. आमदार होण्याच्या इच्छेने नार्वेकर सभागृहात गेले असतील तर त्यांनी इच्छापूर्तीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यांशी संपर्क करावा. त्यानंतर काहीही काहीही होऊ शकते."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in