Mahavikas Aghadi Sabha : आता शिंदे सरकारला जागा दाखवायची वेळ आली आहे : अजित पवारांचा इशारा

हा देखो कोठला काढला? कुठल्या राज्यातून आला, हा देखो?
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

मुंबई : राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने ‘देखो आपला महाराष्ट्र’ अशी जाहिरात केली आहे. या सरकारला मराठी भाषेचीही अडचण निर्माण झाली आहे का? मराठीत देखो म्हणतात का? पहा आपला महाराष्ट्र असा म्हणा ना. हा देखो कोठला काढला? कुठल्या राज्यातून आला, हा देखो? आता ह्यांनाच पाहण्याची वेळ आलेली आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला. (Now is the time for this government to show its seat : Ajit Pawar)

महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज एक मे दिनी मुंबईत झाली. त्या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुसंक म्हटले आहे. त्याची या सरकारला लाज वाटत नाही. राज्यातील दंगली रोखण्याची जबाबदारी असतानाही ती जबाबदारी पार न पाडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही टिपण्णी केली आहे. त्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही वाटत नाही का?

Ajit Pawar
Ajit Pawar News : ‘त्या’ गोष्टींवर विश्वास ठेवण्याचे काहीएक कारण नाही : अजितदादा अखेर त्या बातमीवर बोलले

मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही साडेबारा कोटी जनतेचे प्रमुख आहात. बोलत असताना घोटाळा करू नका. मात्र, हे घोटाळा करून मुख्यमंत्री झालेले आहेत. आता त्यांना जागा दाखवण्याची गरज आहे. आपली ऐकी टिकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी दोन चार पावले मागे पुढे झाले पाहिजे. जिंकून येण्याची क्षमात हा उमेदवारीचा निकष असला पाहिजे. पण आपल्यातही जाणीवर्पूवक बातम्या पसरवल्या जातात. टिल्ली टिल्ली लोकही काहीही बोलत आहेत, असा टोमणाही पवार यांनी मारला.

Ajit Pawar
Mahavikas Aghadi Sabha : पंचवीस वर्षे सोयरीक असलेल्या भाजपनेच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला : भाई जगतापांचा हल्लाबोल

बदल्यांचे रेट ठरले आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केला आहे. बदल्यासाठी रेट असा प्रकार महाराष्ट्रात कधीही घडलेला नव्हता. भ्रष्टाचारी कारभार राज्यात सुरू आहे. सर्व गोष्टी मंत्रालयातून हलत आहेत. जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी चालेली आहे. जनतेच्या पैशावर यांचा उदोउदो कोण चालवून घेणार आहे, असा सवालही त्यांनी केला.

Ajit Pawar
Konkan News : शिवसेनेचा राष्ट्रवादीला धक्का : तालुकाध्यक्षांनी घेतले शिवधनुष्य हाती

पवार म्हणाले की, मधल्या काळात दीडशे बैठका घेणारा हिंदकेसरी महाराष्ट्राला मिळाला, असा दावा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी त्यांचं षडयंत्र सुरू होते, हे त्यांनीच सांगून टाकलं आहे. मात्र, आम्ही सत्तेसाठी हपालेलो नाही. मात्र, जनतेच्या विकासाला तडा जाऊ न देणे आपली जबाबदारी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com