आता भाजपच शिंदे गटाला सुरुंग लावणार : भास्कर जाधवांनी पुन्हा डिवचलं...

Shivsena-BJP Politics| भाजपकडे असं मशीन आहे की विरोधी पक्षात असताना तो माणूस भ्रष्टाचारी असतो, चारित्र्यहिन असतो, तो खूप मोठा आरोपी असतो, पण तो फक्त भाजपात गेला की तो स्वच्छ होतो,
Bhaskar Jadhav
Bhaskar JadhavSarkarnama

Bhaskar Jadhav : मुंबई : उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाही, त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे 40 आमदारही फोडले, पण हे चाळीस आमदारही स्थिर राहु नयेत यासाठीही भाजप प्रयत्न करत आहे. आता भाजपच (BJP) शिंदे गटाला सुरुंग लावणार, असा थेट आरोप शिंदे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला आहे.

नालासोपाऱ्यात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील अनेक विषयांवरुन सरकारवर टीका केली. बंडखोर आमदारांमध्ये सुरु असलेले नाराजीनाट्य, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गजानन किर्तिकारांचा शिंदे गटातील पक्षप्रवेश यावरही त्यांनी कडाडून टीका केली.

Bhaskar Jadhav
Telangana News : तेलंगणात सर्वत्र 'कमळ' फुलत आहे : मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर मोदींचा वार!

शिंदे गटातील आमदार जास्त काळ समाधानी राहू शकणार नाहीत, याची आम्हाला कल्पना होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पदावरुन खाली खेचण्यासाठी भाजपने खुप मोठ षडयंत्र रचलं, अनेक प्रयत्न केलं, पण त्यांना यश आलं नाही. त्यांनी आमच्याच घरात फुट पाडली. त्यांनी आमचे चाळीस आमदार फोडले, पण आता हे चाळीस आमदारही स्थिर राहु नयेत यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पण भाजपचा हेतू साध्य झाला, उद्धव ठाकरेंना त्यांनी पदावरुन पायउतार केलं. पण आता हेच भाजप नेते लवकरच शिंदे गटाला सुरुंग लावतील, एवढचं मी तुम्हाला सांगतो, असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचे प्रकरण लावून धरले होते. पण आता त्यांनीच आपण आता विषय संपवूया, असं म्हटलं आहे. चित्रा वाघ यांच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण त्यांनी मला दम दिलाय की माझ्याबाबत बोलू नका म्हणून, असा मिश्किल टोलाही जाधव यांनी लगावला. याचवेळी बोलताना ते म्हणाले की, आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमधले जे जे भाजपात गेले, त्यांच्याकडे पाहिलं तर ते भाजपात जाण्याआधी भाजपनेच वेगवेगळे आरोप केलेले आहेत. भाजपने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांचे चारित्र्यावर आरोप केले, इडी, इनकम टॅक्सचे आरोप केले, त्यांच्यामागे पोलिसांच्या, इडीच्या, अशा ना ना तऱ्हेच्या चौकश्या लावल्या. पण ज्या वेळी त्यांनी भाजपला समर्थन दिले, किंवा ते भाजपात गेले त्याचवेळी ते साफ स्वच्छ झाले. असही भास्कर जाधवांनी म्हटलं.

Bhaskar Jadhav
Devendra Fadnavis : ठाकरे सरकारच्या काळात गेलेले प्रकल्प आमच्या नावाने दाखवणे बंद करा!

भाजपकडे असं मशीन आहे की विरोधी पक्षात असताना तो माणूस भ्रष्टाचारी असतो, चारित्र्यहिन असतो, तो खूप मोठा आरोपी असतो, पण तो फक्त भाजपात गेला की तो स्वच्छ होतो, क्लिन होतो. भ्रष्टाचारमुक्त होतो, चारित्र्यसंपन्न होतो. याच संस्कारातून चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचे प्रकरण संपवूया असे बोलल्या असाव्यात, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला. भाजपकडे अशी कोणती मशीन आहे माहीत नाही, पण त्यांच्या मशीनमध्ये ED ची पावडर असावी, असा टोलाही त्यांनी मारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in