परमबीरसिंह-वाझेमुळे उपनिरीक्षकासह चार पोलिसांच्या नोकऱ्या धोक्यात

परमबीरसिंह आणि सचिन वाझे यांच्यामुळे उपनिरीक्षकासह चार पोलिसांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
Param Bir Singh and Sachin Waze
Param Bir Singh and Sachin Waze Sarkarnama

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांच्यामुळे चार पोलिसांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. या दोघांची गुप्त भेट झाल्याप्रकरणी एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचारी दोषी आढळले आहेत. त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे.

परमबीरसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर देशमुख यांच्या वकिलांनी परमबीरसिंह आणि वाझे यांच्या भेटीची माहिती दिली होती. त्यावर समितीने ही भेट आपल्यासमोर झाली नसल्याचे स्पष्ट करीत आक्षेप घेण्यास नकार दिला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी पुढाकार घेतला होता.

वाझे हा सध्या एनआयएच्या ताब्यात असला तरी तो तळोजा कारागृहात आहे. त्याला समितीसमोर हजर करण्याची जबाबदारी एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर होती. आता या भेटीमुळे या चार जणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. या चौघांना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दाखवा नोटीस बजावली होती. नंतर झालेल्या चौकशीत वाझेसोबत सुरक्षेस असलेले हे 4 पोलीस दोषी आढळले होते. या चौघांना पोलीस आयुक्तांनी नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई का करू नये याचे लेखी उत्तर मागितले आहे.

Param Bir Singh and Sachin Waze
फटेचा असाही प्रवास : गोव्यात हमाली ते बार्शीत येऊन करोडोंचा चुना

अशी झाली होती भेट

परमबीरसिंह हे गृहरक्षक दलाचे महासंचालक आहेत. ते मागील वर्षी 29 नोव्हेंबरला पहिल्यांदाच दक्षिण मुंबईतील होमगार्ड ऑफिसमध्ये गेले होते. रजेवरुन परतल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारलेला नव्हता. दरम्यान, चांदीवाल समितीचे कार्यालय याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आहे, तर गृहरक्षक कार्यालयाचे कार्यालय हे पहिल्या मजल्यावर आहे. समितीसमोर हजर राहण्यापूर्वी परमबीरसिंह आणि वाझे यांची तेथील एका खोलीत गुप्त भेट झाली होती. त्यावेळी या दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली. त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले ते कळू शकले नव्हते. तब्बल आठ महिन्यांनंतर परमबीरसिंह आणि वाझे समोरासमोर आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com