राष्ट्रवादीशी युती न करणे, ही आमची चूक होती अन्‌ त्याचे प्रायश्चित सध्या भोगतोय!

पण हे खरं आहे की शिवसेनेसोबत युती केली ही आमची चूक होती. त्या चुकीचे प्रायश्चित आताही आम्ही भोगतोय.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर (ncp) २०१७ मध्ये युती न करता, आम्ही शिवसेनेशी (shivsena) युती केली, ही आमची चूक होती. सध्या आम्ही त्या चुकीचे प्रायश्चित भोगतोय, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे (bjp) ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी खंत व्यक्त केली. (Not to form an alliance with NCP, It was our mistake : Sudhir Mungantiwar)

आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एका कार्यक्रमात बोलताना २०१७ मध्येच राष्ट्रवादीशी युती करावी, असे भाजपला वाटते होते. त्याबाबतची बोलणीही झाली होती. मंत्रीपदे, पालकमंत्री आणि लोकसभेच्या जागा कोण किती लढवणार, याबाबतची चर्चाही झाली होती. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे सरकार बनवावे, असे सांगितले होते. त्यास राष्ट्रवादीने नकार दिला होता, त्यामुळे आम्ही शिवसेनेशी युती केली होती, असा गौप्यस्फोट शेलार यांनी केला होता.

Sudhir Mungantiwar
राष्ट्रवादी सोडताच काँग्रेसकडून मिळाली कारखान्याच्या उमेदवारीची बक्षिसी!

त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करत सरकार स्थापन करण्याचा आमचा प्रस्ताव होता. हे अगदी खरं. त्याबाबत तेव्हा चर्चाही झाली होती, हे आशिष शेलार यांनी सांगिलेले अगदी खरं आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षात एक मोठा प्रवाह असा होता की शिवसेनेला सोडून राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणे योग्य नाही. शिवसेना आपला जुना मित्रपक्ष आहे. विचारांमध्ये समानता आहे. पण हे खरं आहे की शिवसेनेसोबत युती केली ही आमची चूक होती. त्या चुकीचे प्रायश्चित आताही आम्ही भोगतोय.

Sudhir Mungantiwar
काँग्रेस सोडणे, ही चूकच होती : राष्ट्रवादीला रामराम केलेल्या ज्येष्ठ नेत्याची कबुली

शिवसेनेसोबत आम्ही गेलो. त्यांना १२ मंत्रीपदं दिली आणि त्यांच्यासोबत आम्ही पुन्हा जोडलो गेलो. त्या अगोदर झालेल्या निवडणुकीत आम्ही त्यांच्याशी युती न करता स्वतंत्र लढलो होतो. पण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांचा विचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा शिवसेना-भाजप युती केली. पण ती आमची चूक झालेली आहे. त्या चुकीतून आम्ही आता बरंच काही शिकलो आहोत. आगामी २०२४ मध्ये भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे जनतेच्या आशीर्वादाने राज्यातील ९७ हजार बूथपर्यंत आमचा विचार पोचवू आणि स्वतःच्या बळावर निवडणूक जिंकू, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in