मुख्यमंत्री नव्हे तर श्रीकांत शिंदेंच महाराष्ट्राचे 'सुपर सीएम'; राष्ट्रवादीकडून 'तो' फोटो व्हायरल...

NCP| Shrikant Shinde| लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे?
NCP| Shrikant Shinde|
NCP| Shrikant Shinde|

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. पण ते दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे मुख्यंमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून मुख्यमंत्री पदाचा कारभार चालवत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे करण्यात आला आहे. श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले असतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

NCP| Shrikant Shinde|
'मायक्रो फायनान्स' मधून लाखोंची फसवणूक करणाऱ्या 'बंटी-बबली' च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्याचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा शासकीय निवासस्थानातील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटोच ट्विट केला आहे. ''खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?' असे ट्विट करत शिंदे सरकारवर निशाणाही साधला आहे.

याचवेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री धमक्या आणि शिवराळ भाषा वापरतात हे कितपत योग्य आहे. महाराष्ट्रात उद्योग गुंतवणुक यावी यासाठी प्रयत्न करा केंद्रात मंत्री असल्याचा महाराष्ट्राला काही फायदा आहे का? असा खोचक टोलाही त्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर,'1 डॉलर = 81.20 रु रुपया. गेल्या 75 वर्षातील नीचांकी पातळीवर आहे. भाजप म्हणजे आर्थिक गैरव्यवस्थापन.'' याकडेही त्यांनी राज्य सरकार आणि केंद्राचे लक्ष वेधले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती मंडळ, नवरात्र उत्सव, पितृपक्ष किंवा दिल्ली वाऱ्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेंच काम पाहण्याची जबाबदारी त्यांनी सुपर सीएम म्हणून श्रीकांत शिंदेंकडे दिल्याचे दिसत आहे. पण राज्याचा कारभार नेमकं कोण पाहतंय? असा सवाल वर्पे यांनी उपस्थित केला आहे. हे राज्य अधांतरी आहे असंच वाटतंय. ज्याला जे वाटतंय,तसं तो करतोय”, अशी टीकांही वर्पे यांनी केली आहे.

वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान आहे. श्रीकांत शिंदे ज्या खुर्चीत बसलेत त्या त्यांच्या मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, असंही लिहिलं आहे. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा सन्मान त्यांच्या कुटुंबीयांसह सर्व सर्वांनीच ठेवायचा असतो. तुम्हाला इतर शासकीय किंवा अनौपचारिक भेटीगाठी घ्यायच्या असतील, तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या बाजूला बसून तुम्ही त्या घेऊ शकता. पण मुख्यमंत्र्यांची खुर्ची ही महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या स्वाभिमानाची खुर्ची आहे”, असंही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in