'दुबईतील कलमे हा ठाकरेंचा उजवा हात, परबांचा चाहता अन् आव्हाडांचा 'सचिन वाझे'!'

प्रवीण कलमे (Praveen Kalme) यांच्या विरोधात कारवाई झाल्यानंतर किरीट सोमय्या यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Praveen Kalme
Praveen Kalmesarkarnama

मुंबई : एसआरएमधून फाईल चोरी केल्याप्रकरणी प्रवीण कलमे यांच्या विरोधात पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. कलमे देश सोडून गेल्याची माहिती असल्याने त्यांच्या विरोधात लूक आउट नोटीसही जारी करण्यात आली. एसआरएमधून फाईल चोरी केल्या प्रकरणी कलमे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सडकून टीका केली आहे.

सोमय्या यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, कलमे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा उजवा हात तसेच शिवसेना (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab) यांचा चाहता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा सचिन वाझे आहे, असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला.

Praveen Kalme
ठाकरेंनी दिलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत शिंदे म्हणाले, ‘मी त्याबाबत...’

अनेक वसुलीचे धंदे सुरू होते. त्या कलमे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांना लूक आऊट नोटीस काढावी लागली. कलमेने सरकारी फाईली चोरल्या. उद्धव ठाकरे यांनी कलमेच्या तक्रारीवर सहा आदेश दिले होते. वेगवेगळे अधिकार, सोमय्या परिवार सगळ्यांविरोधात तक्रारी देण्यात आल्या होत्या.

आता दुबईत लपलेल्या कलमेला मुंबई पोलिसांना दुबईहून पकडून न्यायालयात हजर करावेच लागणार आहे. उद्धव ठाकरे हेच स्वतः कलमेला सरकारी फाईल चोरायला लावायचे, असा धक्कादायक आरोप सोमय्या यांनी केला आहे. सगळ्यांकडून वसुलीचे धंदे सुरू होते. मागील ६ महिन्यांपासून आम्ही कलमेविरोधात कारवाईची मागणी करत होतो, असेही सोमय्या यांनी नमूद केले.

Praveen Kalme
सेना विरुद्ध शिंदे गट : विधानसभेतील पहिला सामना रंगणार, सेनेकडून व्हीप जारी...

कलमे यांनी एसआरएमधील सरकारी फाईल चोरल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी त्यांना अटक करू नये यासाठी फोन देखील केले होते. शेवटी अंत जवळ आला आहे, अशी खोचक टीका सोमय्या यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com