लस घेतली तरच दुकाने उघडता येणार

बीड (Beed) जिल्ह्यात आता कोविड 19 लस घेतली तरच, दुकानदारांना आपली दुकाने उघडता येणार आहेत. त्याचबरोबर शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात लस बंधनकारक असणार आहे.
लस घेतली तरच दुकाने उघडता येणार
vaccination drivesarkarnama

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरणाचे (vaccination drive) उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे प्रशासनानेही आता कडक धोरण अवलंबले आहे.

काही ठिकाणी लसीची किमान एकही मात्रा न घेतलेल्या नागरिकांना पेट्रोल, गॅस, रेशन मिळणार नाही. पर्यटनस्थळांवर प्रवेश मिळणार नाही. खासगी किंवा सरकारी वाहनाने प्रवासबंदी करण्यात आली आहे. शिवाय पर्यटनस्थळांवर असलेल्या हॉटेल, रिसॉर्ट, दुकाने आदींमधील कर्मचाऱ्यांना देखील लसीकरण सक्तीचे केले आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात आता कोविड 19 लस घेतली तरच, दुकानदारांना आपली दुकाने उघडता येणार आहेत. त्याचबरोबर शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात जर एंट्री करायची असेल, तर लस बंधनकारक असणार आहे. "नो व्हॅक्सिन नो एंट्री" असा आदेश बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा (Radhavinod Sharma) यांनी रविवारी उशिरा काढले आहेत.

राज्याचे तुलनेत बीड (Beed) जिल्ह्याच्या लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हे वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी, रात्री उशिरा जिल्ह्यात अनेक निर्बंध घातले आहेत. व्यवसायिकांबरोबरच त्यांच्या कर्मचार्‍यांना, लसीचा किमान एक डोस घेणे आवश्यक असून घेतला नसल्यास त्यांना दुकाने उघडता येणार नाहीत. शिवाय शासकीय- निमशासकीय कार्यालय, मंदिर यासह जवळपास सर्वच ठिकाणी, लस घेतली नसल्यास "नो व्हॉक्सिन नो इंट्री" असून प्रवेश दिला जाणार नाही.

vaccination drive
''यह क्या किया तुने sameer Dawood Wankhede? आज निकाल

शैक्षणिक संस्था, क्लासेससह इतर संस्थांमध्ये देखील लसीकरण केले नसल्यास प्रवेश नाकारला जाणार आहे. याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रात्री उशिरा काढले आहेत. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर आता, बीड जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेने (vaccination drive) यशाचा आणखी एक टप्पा पार केला आहे. बुधवारी राज्यात पहिला डोस घेणाऱ्यांची (vaccination first dose) संख्या 7 कोटींच्या पुढे गेली आहे. ही कामगिरी करणारे महाराष्ट्र (Maharashtra) हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. बुधवारी दुपारपर्यंत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 7 कोटी 1 लाख 18 हजार 259 झाली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने (health authorities) दिली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in