गृहविभागाने आमदारांची सुरक्षा काढली: दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टच सांगितलं...

Dilip Walse-Patil latest news | राज्याच्या गृहविभागाने शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या घराची सुरक्षा व्यवस्थाही काढून घेतल्याची कारवाई केल्याची माहिती समोर आली होती.
Dilip Walse-Patil  latest news |
Dilip Walse-Patil latest news |

मुंबई : राज्याच्या गृहविभागाने शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या घराची सुरक्षा व्यवस्थाही काढून घेतल्याची कारवाई केल्याची माहिती समोर आली होती. या कारवाईनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहीत कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असल्याचे म्हटले. तसेच, जर आमच्या कुटूंबियांना काही झालं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि आणि खासदार संजय राऊत याला जबाबदार असतील, असंही सांगितलं. (Eknath Shinde Latest news update)

यानंतर गृहमंंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेत हे शिंदेंचा दावा फेटाळून लावला आहे. राज्यसरकारने कोणत्याही आमदारांची सुरक्षा काढून घेतलेली नाही. कुटूबियांची सुरक्षा काढली नाही. आमदारांच्या घरांना सुरक्षा कायम आहे. पण आमदारांची सुरक्षा राज्यापुरती मर्यादित आहे. सुरक्षा काढण्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. पोलीस दल अलर्टवर आहे. राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असंही दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं.

Dilip Walse-Patil  latest news |
आमच्या कुटूंबियांची जबाबदारी तुमच्यावर; शिंदेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

त्याचवेळी त्यांनी, ''राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत,'' असे ट्विट करत दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ''राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे लिहीत त्यांनी शिवसेनेला एक प्रकारे इशाराच दिला आहे. तर दूसऱ्या ट्विट मध्ये, 'गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे,' अशी खंतही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना लिहिलेले पत्र लिहीले आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेतील एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची सुरक्षाव्यवस्था काढण्यात आल्याची तक्रार शिंदेंनी केली आहे. तसेच, आमदारांच्या कुटुंबीयांना धमकवण्याचा प्रयत्न होतोय.आमदारांच्या कुटूंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असून त्यांच्या कुटूंबियांना काही झालं तर त्याला जबाबदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,पर्यावरण आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत जबाबदार असतील असे म्हटले आहे. या पत्रावर शिवसेनेच्या 38 आमदारांच्या सह्यादेखील आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com